सोलापूर : महाराष्ट्र राज्य गांधी फोरमच्या अध्यक्षपदी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. सातलिंग शटगार यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र राष्ट्रीय गांधी फोरमचे प्रभारी अध्यक्ष पुरुषोत्तम बलदवा यांच्या उपस्थितीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी जनवात्सल्य येथील निवासस्थानी देण्यात आले. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, फोरमचे सचिव नंदकुमार यल्ला, डॉ. मंगेश शहा, हॉकीपटू जहांगीर शेख, माजी रणजी क्रिकेटपटू बाळ दळवी, उद्योगपती राजकुमार राठी, चंद्रकांत कोंडगुळे, कृष्णदेव वाघमोडे, प्रा. बोळकोटे आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी फोरमचे राष्ट्रीय प्रभारी अध्यक्ष बलदवा यांनी संस्थेच्या २५ वर्षांचा आढावा घेतला. ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी स्व. तुळशीदास जाधव हे गांधी फोरमचे महाराष्ट्राचे प्रमुख होते. त्यांच्यानंतर अध्यक्षपद बलदवा यांच्याकडे आले. आता शटगार यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी या निवडीचे स्वागत करून शटगार यांचे अभिनंदन केले. महात्मा गांधी एक विचार आहे आणि ते विचार कधीही संपत नाही, असे सांगतानाच गांधीजींच्या जीवनावर आधारित एक मोठे प्रदर्शन सोलापुरात व्हावे अशी सूचना शिंदे यांनी केली. या प्रसंगी गांधी फोरमचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
