सोलापूर : सेटलमेंट फ्रि कॉलनी ६ येथील शकलेश सिद्राम जाधव (वय ३७) याला सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. त्याच्यावर २०२३ ते २०२५ या काळात त्याच्याविरुद्ध सलगर वस्ती पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस आयुक्तालयास पाठविला होता. त्यानुसार पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी शकलेश जाधव याला दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याच्या वर्तनात सुधारणा अपेक्षित आहेत, अन्यथा भविष्यात त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.







