‘ना नफा–ना तोटा’ तत्त्वावर रुग्णवाहिकेचे लोकार्पण
सोलापूर : बसव ब्रिगेडच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या पुढाकारातून राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांसाठी ‘ना नफा–ना तोटा’ तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जुळे सोलापुरातील श्री प्रभुलिंग मंदिर येथे पार पडले. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेत हातभार लावण्याचा निर्धार या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक सिद्धू पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संतोष पवार, भाजपचे नगरसेवक प्रशांत पल्ली, एमआयएमचे नगरसेवक शोएब चौधरी, युवा उद्योजक राघवेंद्र जामगोंडी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत रमनशेट्टी, काशिनाथ मेलगिरी, शिवलिंग शाबादे, आनंद मुस्तारे, समाजसेवक श्याम धुरी, लक्ष्मीकांत बिराजदार, रुग्णवाहिका उद्योजक श्रीशैल रोडगे, राजेंद्र हौदे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
संतोष पवार म्हणाले: , राजकारणापलीकडे जाऊन समाजकारण करणे ही काळाची गरज आहे. बसव ब्रिगेडने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबांसाठी ही सेवा जीवनदायी ठरेल. प्रशासनानेही अशा उपक्रमांना सहकार्य करावे. समाजहितासाठी सर्वांनी एकत्र येणे हाच खरा विकास आहे.

प्रशांत पल्ली म्हणाले, आपत्कालीन सेवेत वेग आणि परवडणारी सेवा महत्त्वाची असते. ही रुग्णवाहिका अनेक गरजूंसाठी आधार बनेल. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थांना शासनाची मदत मिळाली पाहिजे. बसव ब्रिगेडचा हा उपक्रम आदर्शवत आहे. भविष्यात आणखी सेवा प्रकल्प राबवावेत, अशी अपेक्षा आहे. युवा उद्योजक राघवेंद्र जामगोंडी म्हणाले, मानवी जीवनापेक्षा मोठे काहीच नाही. गरजूंसाठी उपलब्ध होणारी ही रुग्णवाहिका सेवा समाजातील उदात्त सेवेचे प्रतीक आहे. सर्व समाजघटकांनी अशा चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. ही रुग्णवाहिका अनेकांना नवजीवन देईल. बसव ब्रिगेडचे कार्य कौतुकास्पद आहे. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत सामान्य नागरिकांना परवडणारी व तातडीची सेवा उपलब्ध व्हावी, हा या संकल्पनेमागचा मुख्य हेतू असल्याचे जिल्हाध्यक्ष अमित रोडगे यांनी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे शहर सचिव राहुल जत्ती, सहसचिव अविनाश बिराजदार, सोशल मीडिया प्रमुख दत्तात्रय केरे, प्रसिद्धी प्रमुख विशाल पाटील, जुळे सोलापूर प्रमुख अमरनाथ दामा, शहर उपाध्यक्ष सिद्धांत रंगापुरे, सुधाकर कोरे, नागराज बसवराज मुनोळी, राहुल महादेवकर, शुभम गुजरे, अमर टक्का, चेतन गड्डम, संकेत मसुती, सुनिल तगेळी, शंकर शिवानंद पडसलगी,लगक्षट्टी, आदींचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.










