Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सत्ताधारी परिवार पॅनलची माहिती : सोलापूर जनता बँक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक

राजेश भोई by राजेश भोई
March 12, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सत्ताधारी परिवार पॅनलची माहिती : सोलापूर जनता बँक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक
0
SHARES
10
VIEWS

सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सत्ताधारी परिवार पॅनलमधील विद्यमान संचालकांच्या प्रयत्नांमुळे गेल्या चार वर्षांमध्ये सोलापूर जनता सहकारी बँकेला १०० कोटींहून अधिक नफा मिळाला आहे, अशी माहिती बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुनील पेंडसे आणि परिवार पॅनलचे सहनिवडणूक प्रमुख जगदीश भुतडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीस सामोरे जाताना सत्ताधारी परिवार पॅनलने पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. पेंडसे म्हणाले, मार्च २०२१ मध्ये सोलापूर जनता सहकारी बँकेला ११ कोटी ८६ लाख रुपयांचा तोटा होता. गेल्या पाच वर्षांमध्ये हा तोटा भरून काढून बँकेने भरीव प्रगती केली. बँकेचा ग्रॉस एनपीए १७.१३ टक्के (१८७.४१ कोटी रुपये) होता. तसेच बँकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे २०१७ -१८ या आर्थिक वर्षापासून सभासदांना लाभांश देणेही शक्य झालेले नव्हते. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये ११ कोटी ८६ लाख रुपयांचा तोटा भरून काढून विद्यमान संचालकांच्या प्रयत्नामुळे १०० कोटी रुपयांनी अधिक नफा बँकेने मिळवला आहे. यंदाच्या मार्च अखेर देखील बँकेचा नेट प्रॉफिट २५ ते ३० कोटी राहणार आहे. बँकेचा ग्रॉस एनपीए ६.५६ टक्के (७३.७३ कोटी रुपये) असून नेट एनपीए ०.३२ टक्के आहे. बँकेने सभासदांना २०२२-२३ या आर्थिक वर्षात ७ टक्के, २०२३-२४ मध्ये ८ टक्के, २०२४-२५ मध्ये ९ टक्के असा चढत्याक्रमाने लाभांश दिला आहे.

बँकेचा प्रॉव्हिजन कव्हरेज रेशो ९५.४० टक्के आहे. चांगल्या कामगिरीमुळे बँक एसएएफच्या निर्बंधामधून बाहेर पडली आहे. बॅंकेच्या राखीव ठेवी २२० कोटी रुपयांच्या आहेत. नेट वर्थ १९५ कोटी रुपयांचे असून भांडवल पर्याप्तता गुणोत्तर २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे तर सीडी रेशो ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. बँकेने तीन हजार कोटी रुपयांचा मिश्र व्यवसाय केला आहे. बँकेने स्वतःचे मोबाईल बँकिंग सुरू केले असून नेट बँकिंग देखील लवकरच सुरू होणार आहे. बँकचा यूपीआय प्रणालीमध्ये समावेश होणार असून ही सेवा ग्राहकांना लवकरच उपलब्ध होईल. याशिवाय २०२६-२७ या आर्थिक वर्षात बँकेच्या चार नव्या शाखा उघडण्याचा मानस असल्याचेही सुनील पेंडसे आणि जगदीश भुतडा यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस परिवार पॅनलचे निवडणूक सहप्रमुख, जगदीश भुतडा, उमेदवार सुनील पेंडसे, पुरुषोत्तम उडता, राजेश पवार, सी. ए. गिरीश बोरगांवकर, विष्णू मोंढे, सी. ए. आनंद करवंदे, महादेव न्हावकर, ऍड. मल्लिनाथ शहाबादे, सुरेश चिक्कळी, प्रमोद भुतडा, ऍड. मिलिंद कुलकर्णी, डॉ. हर्षल डंबळ, अमित आपटे, चरणसिंग चौव्हाण, चंद्रिका चौहान, गौरी आमडेकर, रवींद्र साळे, जेष्ठ मागर्दशक रंगनाथ बंकापूर, प्राचार्य गजानन धरणे, निवडणूक कार्यालय प्रमुख प्रा. देवानंद चिलवंत, मयांक चौहान, विनायक बंकापूर उपस्थित होते.

बँकेचा एनपीए ०.३२ टक्क्यांवर
सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या प्रयत्नांमुळे बँकेने मोठ्या प्रमाणावर वसुली केली आहे. त्यामुळे बँकेचा नेट एनपीए ८.४७ टक्क्यांवरून ०.३२ टक्क्यांवर आला आहे. हे बँकेच्या आर्थिक प्रगतीचे लक्षण आहे असेही सुनील पेंडसे यांनी सांगितले.

बँकेची तुलनात्मक स्थिती –

  • मार्च २१ ची स्थिती
  • तोटा – ११ कोटी ८६ लाख रुपये
  • ग्रोस एनपीए – १७.१३ टक्के (१८७ कोटी ४१ लाख रुपये)
  • नेट एनपीए – ८.४७ टक्के (८३ कोटी ९१ लाख रुपये)
  • लाभांश – २०१७-१८ पासून दिला नव्हता.
  • एसएएफ – बँक सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्कमध्ये होती.

मार्च २६ ची स्थिती
मागील ११ कोटी ८६ लाख रुपयांचा तोटा भरून काढून ४ वर्षात १०० कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला.
या मार्च एंडला देखील नेट प्रॉफिट २५ ते ३० कोटी रुपये असणार.

६ मार्च अखेर
ग्रोस एनपीए – ६.५६ टक्के (७३ कोटी ७३ लाख रुपये)
नेट एनपीए – ०.३२ टक्के (३ कोटी ३९ लाख रुपये)

  • लाभांश
  • २०२२-२३ – ७% दिला.
  • २०२३ -२४ – ८% दिला.
  • २४ – २५ – ९% दिला.
  • २५ -२६ या आर्थिक वर्षात देखील देता येईल अशी स्थिती.
  • प्रोव्हिजन कव्हरेज रेशो -९५.४० टक्के
  • एसएएफ – चांगल्या कामगिरीमुळे बँक सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्कमधून बँक बाहेर पडल्यामुळे आता कोणतेही निर्बंध नाहीत.
  • राखीव निधी – २२० कोटी रुपये
  • नेट वर्थ – १९५ कोटी
  • सीआरएआर – भांडवल पर्याप्तता गुणोत्तर २० टक्के पेक्षा जास्त
  • सीडी रेशो – ६० टक्के पेक्षा जास्त
  • मिश्र व्यवसाय – ३ हजार कोटी
  • मार्च २०२६ अखेर नेट एनपीए शून्य टक्क्यांवर येणार हा विश्वा

Previous Post

सोलापूर महापालिकेत रुग्णवाहिकांचा मोठा ‘स्कॅम’? ८ रुग्णवाहिका बंद अवस्थेत; अमोल शिंदे कडाडले!

Next Post

सोलापुरात राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचा थरार; महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन!

Related Posts

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान
सोलापूर जिल्हा

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक
सोलापूर जिल्हा

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
Next Post
सोलापुरात राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचा थरार; महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन!

सोलापुरात राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचा थरार; महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025