सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद संकुलात आयोजित या सभेत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुलदीप जंगम यांनीअजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामूहिक श्रद्धांजली वाहिली.


यावेळी बोलताना उपस्थित अधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव केला. या शोकसभेला सोलापूर जिल्हा परिषदेतील सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी आणि मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून मृतात्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली. या शोकसभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील ,मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले ,प्रसाद मिरकले व इतर विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते











