सोलापूर : कार्तिकी यात्रेनिमित्त प्रवासी भाविकांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. यादरम्यान हुबळी आणि पंढरपूर दरम्यान विशेष अनारक्षित गाड्या धावणार आहेत.
ट्रेन क्रमांक ०७३५१/०७३५२ एसएसएस हुबळी-पंढरपूर अनारक्षित एक्स्प्रेस विशेष (४ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक ०७३५१ एसएसएस हुबळी येथून २९ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ५:१० वाजता निघेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ४:०० वाजता पंढरपूरला पोहोचेल. (२ फेऱ्या).
ट्रेन क्रमांक ०७३५२ पंढरपूरहून २९ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४:०० वाजता एसएसएस हुबळी येथे पोहोचेल. (२फेऱ्या).
ट्रेन क्रमांक ०७३६७/०७३६८ एसएसएस हुबळी-पंढरपूर अनारक्षित विशेष (८ फेऱ्या),
ट्रेन क्रमांक ०७३६७ ही गाडी ३०, ३१ ऑक्हुबळी येथून पहाटे ५:१० वाजता निघेल आणि त्याच दिवशी दुपारी ४:०० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. (४ फेऱ्या).
ट्रेन क्रमांक ०७३६८ ही गाडी ३०, ३१ ऑक्टोबर आणि २, ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता पंढरपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४:०० वाजता एसएसएस हुबळी येथे पोहोचेल. (४ फेऱ्या).
हुबळी येथून पहाटे ५:१० वाजता निघेल आणि त्याच दिवशी दुपारी ४:०० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. (४ फेऱ्या).
ट्रेन क्रमांक ०७३६८ ही गाडी ३०, ३१ ऑक्टोबर आणि २, ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता पंढरपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४:०० वाजता एसएसएस हुबळी येथे पोहोचेल. (४ फेऱ्या).
या गाडीला धारवाड, अलनावर, लोंडा, खानापूर, देसूर बेळगावी, पाच्छापूर, गोकाक रोड, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, चिंचली, कुडाची, उगर खुर्द, शेडबल, विजयनगर, मिरज, अरग, ढालगाव, जथ रोड, वासुद आणि सांगोला. अनारक्षित कोचसाठी बुकिंग स्टेशनवरील बुकिंग काउंटर आणि यूटीएस अॅपद्वारे देखील करता येते. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे करण्यात आले आहे.







