सोलापूर : उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निहाळे यांना सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारी पदी पदोन्नती मिळाल्यानंतर रिक्त झालेल्या त्यांच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी पदावर हवेली येथील तहसीलदार किरण सुरवसे यांची नियुक्ती झाली आहे. सुरवसे यांना पदोन्नती मिळाली असून, ते मूळचे माढा तालुक्यातील वेताळवाडीचे रहिवासी आहेत.
किरण सुरवसे यांनी सोमवारी दुपारी पदभार स्वीकारला असून, त्यांनी कामकाजाला सुरुवात केली आहे. उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. किरण सुरवसे हे यापूर्वी हवेली तालुक्यात तहसीलदार पदावर कार्यरत होते. त्यांना पदोन्नती मिळाली असून, २००४ पासून ते महसूल विभागात सेवा बजावत आहेत..
