तर सचिवपदी श्रीशैल पाटील यांची निवड..!
सोलापूर: सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये तानाजी माने (मुख्याध्यापक, शरदचंद्र पवार प्रशाला, सोलापूर) यांची अध्यक्षपदी पुन्हा एकदा बहुमताने निवड करण्यात आली आहे. तर, सचिवपदाची जबाबदारी श्रीशैल पाटील (मुख्याध्यापक, श्री शंकरलिंग प्रशाला, हत्तीकणबस, ता. अक्कलकोट) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुख्याध्यापक नियंत्रण समितीचे अध्यक्ष सुभाष माने यांनी ही निवड प्रक्रिया पूर्ण केली. माजी मुख्याध्यापक उत्तम लवटे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.


नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
- अध्यक्ष ; तानाजी माने ; शरदचंद्र पवार प्रशाला, सोलापूर
- उपाध्यक्ष ; अमोल तुकाराम चव्हाण संभाजीराव चव्हाण मा. विद्यालय, विठ्ठलवाडी (माढा)
- उपाध्यक्ष : श्रावण षडाक्षरी बिराजदार ज्ञानसाधना प्रशाला, टाकळी ब्रिज (द. सोलापूर)
- सचिव ; श्रीशैल पाटील श्री शंकरलिंग प्रशाला, हत्तीकणबस (अक्कलकोट)
- कार्याध्यक्ष : रेवन शिवाजी अवताडे विद्यामंदिर हायस्कूल, वाकी (सांगोला)
- खजिनदार लक्ष्मण संदिपान शिंगाडे न्यू इंग्लिश स्कूल, इसबावी (पंढरपूर)
- सहसचिव : पंढरीनाथ मारुती माने शरद पवार विद्यालय, शरद नगर (मंगळवेढा)
- सहखजिनदार : शक्तीकुमार शिवाजीराव संकपाळ नागनाथ प्रशाला, जामगाव (बार्शी)










