सोलापूर : भाजपच्या एबी फॉर्ममध्ये उमेदवाराचे नाव चुकल्याचे बुधवारी छाननीवेळी निदर्शनास आले. या नावाची खात्री करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाèयांनी शहराध्यक्ष राेहिणी तडवळकर यांना 15 मिनिटांचा वेळ दिला, परंतु, तडवळकर पाऊण तासानंतर निवडणूक कार्यालयात पाेहचल्या. त्यामुळे भाजपच्या दुसèया गटातील कार्यकर्त्यांनी तडवळकर यांना राेखण्याचा प्रयत्न केला. धक्काबुक्की झाली. त्यात तडवळकर यांची दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले.


भाजपने प्रभाग 13 मधून विजय चिप्पा यांना उमेदवारी दिली. एबी ाॅर्ममध्ये त्यांचे नाव विनय चिप्पा असल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करावा, अशी मागणी माकपचे अनिल वासम यांनी केली. त्यात भाजपच्या दुसऱ्या गटानेही साथ दिल्याचे दिसून आले. या अर्जाच्या छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मराेड यांनी भाजपच्या शहराध्यक्ष राेहिणी तडवळकर यांना 15 मिनिटात हजर व्हा, अन्यथा निर्णय घेण्यात येईल, असा निराेप दिला. मात्र, तडवळकर पाऊण तासानंतर दाखल झाल्या. छाननीची वेळ संपली असताना निवडणूक निर्णय अधिकाèयांनी वेळ दिल्याचा आराेप करत माकप आणि भाजपचे कार्यकर्ते गाेंधळ घालू लागले. काही कार्यकर्त्यांनी तडवळकर यांचा रस्ता राेखण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रचंड गदाराेळ, ढकलाढकली आणि गाेंधळाची स्थिती निर्माण झाली. त्याही परिस्थितीत धावत पळत जाऊन अखेर कार्यालयात गेले. राेहिणी तडवळकर यांनी निवडणूक कार्यालयात प्रवेश केला. अखेर चिप्पा यांचा अर्ज वैध झाल्याचे सांगण्यात आले.










