सोलापूर: अक्कलकोट रोड येथील शांती चौक भागात असलेल्या आणि सर्व जातिधर्मासाठी खुल्या असलेल्या हिंदू स्मशानभूमीच्या दुरवस्थेची दखल घेत, आज प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या परिसराची संयुक्त पाहणी केली.

यावेळी स्मशानभूमीतील सोयी-सुविधांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले.प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळीया पाहणी दौऱ्यात नूतन महापौर विनायक दादा कोंड्याल, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, अधीक्षक अभियंता अनिल चव्हाण आणि विभागीय अधिकारी बक्षी उपस्थित होते.

प्रशासनाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. केवळ एक जागा नसून आपल्या श्रद्धा आणि अंतिम निरोपाचा सन्मान आहे. स्मशानभूमी स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र पदशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे, प्रधान सचिव वासुदेव इप्पलपल्ली, जनरल सेक्रेटरी दयानंद मामड्याल, पदशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा, विश्वस्त नरसप्पा इप्पाकायल, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, विश्वनाथ दुर्लेकर, छत्रपती अवशेट्टी, भूलिंगम रापेलली, भोजराज पवार, गणेश बिराजदार, सुरेंद्र शिंदे, विनायक खरात, सुनील पाचंगे यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











