हा जुगार अड्डा हारौफ भंडाले व रियाज हुंडेकरी हे चालवत होते अशी माहिती पोलिसांनी दिली..!
सोलापूर : आगामी सोलापूर महानगरपालिका निवडूक अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये चालणाऱ्या अवैध व्यवसायांवर कारवाई करणेबाबत मा. पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेश दिले आहेत.मंगळवारी पहाटे रोजी अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांना सातरस्ता येथील इंडीया टि हाऊसच्या बोळात रौफ भंडाले नावाचा इसम जुगाराचा अड्डा चालत आहे अशी गोपनीय माहिती मिळाली..
माहीतीच्या अनुषंगाने अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांनी सपोनि निलेश पाटील-सोनवणे, सपोनि विजय पाटील व त्यांचे तपास पथकास यांना सातरस्ता येथील इंडीया टि हाऊसच्या बोळात चालु असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकुन कायदेशीर कारवाई करणेबाबतचे आदेश दिले होते.
सपोनि निलेश पाटील-सोनवणे, सपोनि विजय पाटील व त्यांचे तपास पथकाने सातरस्ता येथील इंडीया टि हाऊसच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी एकुण ३० इसम पत्त्याच्या डावावर जुगार खेळत असताना आढळून आले.त्यावेळी सपोनि निलेश पाटील-सोनवणे, सपोनि विजय पाटील व त्यांचे तपास पथकाने जुगार खेळणाऱ्या एकुण २५ इसमांना ताब्यात घेतले.

(१) जावेद बैतुल शेख, (२) राजू आनंद जाधव, (३) आशपाक कादर शेख, (४) जयराज शाहुल सांगे, (५) विनायक विठ्ठल गायकवाड, (६) प्रताप शंकर गायकवाड, (७) कल्याणी शामराव आडकी, (८) मनिष रागू जाधव, (९) शंकरगौडा शिवणगौडा पाटील, (१०) विक्रम मदन गायकवाड, (११) जाकीर महमद हनीफ शेख, (१२) यलप्पा यमनप्पा जाधव, (१३) सिद्राम अशोक कोनीन, (१४) चाँद सैफन नदाफ, (१५) जगन अमृत पात्रे, (१६) अब्दुल मजस्दि गफुर पठाण, (१७) जिलानी हाजी मंलग विजापूरे, (१८) जगदीश नागप्पा भुताळे (१९) इरफान सैफन मलगान, (२०) गोरख पुंडलिक घुले, (२१) कपिल मारूती कांबळे, (२२) विजय ऊर्फ गुडू चंद्रकांत जाधव, (२३) बिलाल जाकीर शेख, (२४) शफिक बाबासाब शेख, (२५) लक्ष्मण चंद्राम आसादे. तसेच इतर ०५ इसम नामे १) दिपक लक्ष्मण जाधव, २) विकास विद्याधर गायकवाड, ३) इसाक मक्तुम अत्तार, ४) वसीम महिबुब पठाण, ५) युन्नुस महिबुब शेख हे गर्दीचा फायदा घेवुन शेडच्या मागील दरवाज्यातुन पळून गेले.
छापा कारवाईमध्ये जुगार खेळताना तेथे मिळून आलेली रोख रक्कम तसेच पत्याचा कॅट, डीव्हीआर, इंन्वरटर व लोखंडी कपाट असा एकुण रु. २,३१,४००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तरी सदर बझार पोलीस ठाण्यत १०४६/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासा दरम्यान सदरचा जुगार अड्डा हा रौफ भंडाले व रियाज हुंडेकरी हे चालवत असल्याचे निष्पन्न झाले असून त्या दृष्टीने पुढील कायदेशीर कारवाई चालू केली आहे.
एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्वीनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), राजन माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखेचे मार्गदर्शनाखाली अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, सपोनि निलेश पाटील-सोनवणे, सपोनि विजय पाटील, पोह/१२६९ राहुल तोगे, पोह/१३०५ विद्यासागर मोहिते, पोह/१४५३ जावीद जमादार, पोह/२८१ विजयकुमार वाळके, पोशि/१४७९ आबाजी सावळे, पोशि/१५२० गणेश शिंदे, पोशि/४०९ धिरज सातपुते, पोशि/१५२८ विठ्ठल यलमार यांनी केली आहे.










