सोलापूर ; पालकमंत्री श्री.गोरे म्हणाले, सोलापूरचे नागरिक मुंबईसाठी विमानसेवेसाठी अनेक वर्षापासून प्रतिक्षा करीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे या विमानसेवेला प्रारंभ होत आहे. नुकत्याच झालेल्या महापुराच्या संकटाच्यावेळी प्रशासनाने चांगली कामगिरी करून जिवीतहानी होऊ दिली नाही. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यामुळे शासन आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पूरग्रस्ताच्या घरी दिवाळी साजरी होण्यासाठी आवश्यक साहित्य देण्यात येत आहे. ८७२ कोटी रुपयाचे शहराच्या अंतर्गत जलवाहिनीचे काम होणार आहे, असेही श्री.गोरे म्हणाले. सोलापूर-तिरुपती विमानसेवा लवकर सुरू करावी आणि शहर विकास आराखड्याचे काम लवकर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहरात होत असलेल्या सुधारणांमुळे औद्योगिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोलापूर विमानतळ प्राधिकरणच्या सहव्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी या कार्यक्रमाचे प्रस्तावित केले. जून २०२५ मध्ये सुरू करण्यात आलेली सोलापूर ते गोवा विमान सेवाचांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.









