जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष देशमुख यांनी दिली माहिती..
सोलापूर: आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक प्रशासनाने कंबर कसली असून, संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांची मतमोजणी प्रक्रिया कोठे पार पडणार, याची अधिकृत यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विशेष सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात हे असणार मतमोजणीचे केंद्रे..!
करमाळा : शासकीय धान्य गोदाम, करमाळा
माढा : वखार महामंडळ गोदाम, अकलूज रोड, ता. माढा
बार्शी : शासकीय धान्य गोदाम, उपळाई रोड, बार्शी
उत्तर सोलापूर : नूतन मराठी विद्यालय, डफरीन चौक, सोलापूर
मोहोळ : शासकीय धान्य गोदाम, मोहोळ
पंढरपूर : शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर
माळशिरस : शासकीय धान्य गोदाम, म्हसवड रोड, माळशिरस
सांगोला : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन, सांगोला
मंगळवेढा : शासकीय धान्य गोदाम, मंगळवेढा
दक्षिण सोलापूर : एसआरपी कॅम्प क्र. १०, सोरेगाव, सोलापूर
अक्कलकोट : तहसील कार्यालय, अक्कलकोट
विशेष म्हणजे सर्व मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेद्वारे केंद्रांचे संरक्षण आली आहेत. तसेच मतमोजणी प्रतिनिधी, शासकीय कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा केंद्रांवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
सीसीटीव्ही देखरेखवर संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली पार पडणार आहे, जेणेकरून पारदर्शकता जपली जाईल. विशेष म्हणजे केवळ अधिकृत ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रवेश दिला जाईल.जिल्हा प्रशासनाने सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना या ठिकाणांची नोंद घेण्यात यावे. असे आव्हान करण्यात आले आहे मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख नियोजन करण्यात आले आहे.- संतोष कुमार देशमुख उपजिल्हाधिकारी सोलापूर










