आदिला नदीच्या पात्रातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेने कारवाई करावी; महापौरांची स्पष्ट भूमिका.
सोलापूर : सोलापूर मध्ये सोलापूर मधील आदिला नदीचा अस्तित्व कायमस्वरूपी टिकलच पाहिजे या ठिकाणी नदीच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नाला होता का हेही पाहिलं पाहिजे अशी आपली या प्रकरणात भूमिका असल्याचं महापौर विनायक कोंड्यालयांनी म्हटल आहे.
आपण कोणत्याही स्थितीत नदी ऐवजी नाला अशी भूमिका घेतलेली नाही याबाबत पर्यावरण प्रेमी मध्ये चुकीची माहिती गेली असावी ही नदी असलीच पाहिजे पाटबंधारे विभागाकडे याविषयीची सविस्तर माहिती बैठकीच्या वेळी उपलब्ध नव्हती ती त्यांना उपलब्ध करण्यास सांगण्यात आलं आहे नदीचा अस्तित्व कायम राहिल्यास आपला पाठिंबाच राहील नदीच्या पात्रामध्ये जर कोणी बेकायदा बांधकाम केले असेल तील प्लॉटिंग केला असेल तर पालिका प्रशासनानं त्यावर कारवाई केली पाहिजे या मताचे आपण आहोत असेही महापौर कोंड्याला म्हणाले.आज सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्ताला कार्यक्रमात ते बोलत होते त्यांचे स्वागत पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केलं.

सोलापुरातील 50 पैकी 14 स्मशानभूमी अदयवत केल्या आहेत उर्वरित स्मशानभूमीच्या कामांमध्ये हे आपण आता महापालिकेच्या फंडातनं लक्ष घालणार आहोतसोलापूर शहरांमध्ये सध्या तीन ते चार दिवसांनी पाणी येतं ते किमान दोन ते तीन दिवसांनी पाणी आलं पाहिजे या दृष्टीने आपले प्रयत्न आहेत पालिका प्रशासन सध्या काही कारण सांगत असले तरी निवृत्त अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन यातून मार्ग काढण्याबाबत आपला प्राधान्यक्रम असेल सोलापूर शहरातील धूळ मुक्तीसाठी आपले प्रयत्न असून नवीन मशनरी घेणं आहे त्या मशिनरीला अधिक स्वच्छतेचे काम वाढवणे याकडे लक्ष दिले जाईल सिद्धेश्वर तलावातील मासे ऑक्सिजन अभावी मृत पावले ही बाब लक्षात घेऊन डीपीडीसी फंडातून दीड कोटी रुपये मिळवून यातून फाउंटन मशीन आणि इतर साहित्य खरेदी करण्याकडे लक्ष आहे येत्या काही दिवसात हे काम होऊन जाईल.
सोलापूर शहरातील बिट्टूचा प्रश्न मार्गी लागत आहे त्याचबरोबर आता गुंठेवारी प्रश्न सोडवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत यातही लवकरच यश येईल हे काम झालं तर महानगरपालिकेचे उत्पन्नही वाढणार आहे सोलापूर शहरात ज्या मार्गावरती बसेस सेवा उत्तमरीत्या सुरू राहू शकेल त्या ठिकाणी नवीन शंभर ई बसेस वापरण्यात येतील असेही महापौरांनी सांगितलं.











