सोलापूर : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत कार्तिकी एकादशीसाठी भाविक कमी येण्याची शक्यता आहे. भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नियमित यात्रा अनुदानाशिवाय यंदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच कोटींचे अधिकचे अनुदान दिल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
कार्तिकी वारीला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी स्वच्छता, आरोग्य विषयक सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी यासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या शौचालय, आहेत. यंदा वारकऱ्यांसाठी प्रशासनाकडून सहा लाख पाणी बॉटल, सहा लाख ज्यूस बॉटल पुरविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.
पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात स्थानिकांची बैठक घेऊन यावर सकारात्मक तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे कॉरिडॉर संदर्भातील जवळजवळ सर्वच प्रश्न मार्गी लागले आहेत. पुढील आठवड्यात जिल्हास्तरीय बैठक घेऊन मान्यतेचा प्रस्ताव पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पालकमंत्र्यांकडून हायपावर समितीकडे तो सादर होईल. त्यावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असे आशीर्वाद यांनी सांगितले.
पंढरपूर कॉरिडॉर हा तीन हजार कोर्टींपेक्षा अधिक खर्चाचा प्रकल्प आहे. यामध्ये भाविकांसाठी पायाभूत सुविधा आणि मंदिराच्या परिसराचा विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पात अनेक मालमत्तांचे भूसंपादन करण्यात येणार आहे. बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
नगर विकास मंत्रालय
मुंबईवैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदांना निधी मंजूर करण्याबाबत. सन 202५-2६ लेखाशिर्ष (2217 1301) अंतर्गत पंढरपूर नगरपरिषद, जि. सोलापूर करीता रक्कम रु.2.75 कोटी






