हुतात्मा दिन विशेष ; इतिहास अभ्यासकांची मांडणी
सोलापूर : सोलापूरच्या चार हुतात्म्यांवर अभ्यासकांनी विपुल लेखन केले. फाशी देण्याचा दिवस १२ जानेवारीच का निवडला याचे विश्लेषणही केले. सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ होण्याच्या दिवशीच फासावर चढवले तर सर्व समाजावर ब्रिटिश राजवटीची दहशत बसेल, हा त्यामागचा उद्देश. पण, त्यांचे बलिदान समतेचा संदेश देणारा ठरला.

मल्लप्पा धनशेट्टी (वय 32) : सविनय कायदेभंग चळवळीत अग्रेसर होते. राष्ट्रीय चळवळीचे प्रतीक म्हणून गांधी टोपी वापरायचे. नंदीध्वज धरत होते.
श्रीकिसन सारडा (वय ३६) : सधन व्यापारी. सार्वजनिक कार्यक्रमांना मदत करत. राष्ट्रीय चळवळीची आर्थिक बाजू सांभाळत म्हणून इंग्रजांच रोष होता.
जगन्नाथ शिंदे (वय २४) : युवक संघ व मजूर संघाचे सरचिटणीस म्हणून काम पाहात होते. तालीम संघाचेही सचिव होते. गिरणी कामगारांची मोट बांधली होती.
कुर्बानहुसेन (वय 20) : सुरुवातीला गिरणी कामगार होते. उत्तम लिखाण, वक्तृत्वामुळे लोकप्रिय झाले. ‘गझनफर’ नामक मराठी वृत्तपत्र सुरू केले होते.
तडफदार व्यक्तिमत्व असणारे जगन्नाथ शिंदे हे युवकांचे व कामगारांचे नेते म्हणून काम पाहत असेल त्यांच्या एका हाकेला सारा कामगार वर्ग एकत्रित व्हायचा. तो जो काळ होता तो देशप्रेमाने भारवून गेलेला होता त्यातच जगन्नाथ शिंदे देखील मागे कसे राहणार. प्रा.डॉ सोनाली गिरी, अभ्यासक










