सोलापूर – राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवाईत अवैध मळी वाहतुकीवर व हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर केलेल्या धडक कारवाईत रूपये १९ लाख ३७ हजार ४३०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची राजेश देशमुख, आयुक्त, महाराष्ट्र राज्य, प्रसाद सुर्वे संचालक (अं व द) मुंबई.व सागर धोमकर साहेब विभागीय उपायुक्त पुणे विभाग याच्या निर्देशानुसार व भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर जे. एन. पाटील प्रभारी उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अ विभाग सोलापूर यांचे कार्यालयास मिळालेल्या खात्रीलायक गुप्त बातमीनुसार पहाटेच्या सुमारास दहिटणे ते बक्षी हिप्परगा रोडवर, दहिटणे हद्दीत, सोलापुर याठिकाणी सापळा लावुन अवैधरित्या मळीची वाहतुक करणारे एक बोलेरो पिकअप चारचाकी वाहन क्र. MH-१३-DQ-६९१० हे मळीसह जप्त करुन निरीक्षक अ विभाग कार्यालयाने गुन्हा नोंद केला आहे.
सदर कारवाईत अवैध हातभट्टी दारु तयार करण्याकरिता वापरण्यात येणारी ४.४८० मे. टन अवैध मळी जप्त करण्यात आली. या कारवाईत ३९,६८०/- रु. किंमतीची मळी व रु.८,००,०००/- किंमतीचे चारचाकी वाहन असा एकुण ८,३९,६८०/- रु. इतका मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन सदर गुन्ह्यातील वाहनाचा चालक हा अंधाराचा फ़ायदा घेवुन पळुन जावुन फरार झाला असुन सदर फरार संशयीत आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास जे. एन. पाटील निरिक्षक अ विभाग सोलापुर हे करत आहेत.
तसेच अवैध हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर कारवाई करण्याकामी विभागीय भरारी पथक, रा.उ.शु., पुणे विभाग, पुणे, पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी, महसुल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांचे समवेत सामुहिक मोहिमेचे आयोजन करुन गुळवंची ता. उत्तर सोलापुर व शिवाजीनगर सोलापुर परिसरातील अवैध हातभट्टी दारु निर्मिती केंद्रांवर छापे मारुन सदर ठिकाणे उध्दस्त गुन्हे नोंद करण्यात आले. सदर कारवाईत ११ गुन्हे नोंद करण्यात आले असुन ०५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २७२५० ली. रसायन. ५३५ ली. तयार हातभट्टी दारु असा एकुण रु. १०,९७,७५०/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर कारवाई निरीक्षक जे. एन. पाटील, अ. व्ही. घाटगे, आर. एम. चवरे तसेच दुय्यम निरीक्षक समाधान शेळके, सुखदेव सिद, शिवकुमार कांबळे, धनाजी पोवार, सचिन शिंदे, राम निंबाळकर सहाय्यक दुय्यम निरीक्षक संजय चव्हाण, जवान कर्मचारी यांनी पार पाडली.







