Wednesday, April 1, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी आहे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राजेश भोई by राजेश भोई
November 2, 2025
in सोलापूर जिल्हा
0
संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी आहे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
0
SHARES
30
VIEWS

पंढरपूर : – वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीत येणारा वारकरी हा आमचा प्रथम व्हीआयपी आहे. संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शेगाव दुमाला येथे श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली महाराज यांच्या समाधी मंदिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत, आमदार अभिजीत पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, संस्था प्रमुख दादा महाराज मोरे माऊली, स्वामी अमृता आश्रम महाराज, चकोर महास्वामी बाविस्कर, ह.भ.प. अक्षय भोसले महाराज, सरपंच सौ. जयलक्ष्मी माने व मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.

 शासनाने मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, आषाढी दिंडी अनुदान, विमा योजना यांसारख्या अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे ज्याने गाईला गोमातेचा दर्जा दिला आहे. हे राज्य संतांची, वीरांची, शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. तसेच  श्री संत मोरे परिवाराच्या वारकरी परंपरेच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले म्हणाले की, हे सरकार शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटात असलेल्या जनतेच्या मदतीला तत्परतेने धावून जाण्याची आमची भूमिका आहे. 

प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री संत मोरे माऊली महाराज यांच्या समाधी मंदिराचे उद्घाटन तर भक्तनिवास क्र. १ चे लोकार्पण रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन सोहळ्यामुळे शेगाव दुमाला गावात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असून, वारकरी संप्रदायासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल ठरले आहे.

Previous Post

बळीराजाला सुखी, समाधानी ठेवण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडं!

Next Post

*उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते कार्तिकीची, वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचा समारोप

Related Posts

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान
सोलापूर जिल्हा

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक
सोलापूर जिल्हा

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
Next Post
*उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते कार्तिकीची, वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचा समारोप

*उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते कार्तिकीची, वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचा समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025