सोलापूर : बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील चारे ते काटेगाव मध्ये पुलाचे काम करण्यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्या पुलाचे भूमिपूजन माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. गेली अनेक वर्षे हा पुल बांधण्यासाठी तेथील ग्रामस्थांची मागणी होत होती.

याबाबत माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्याकडे तेथील ग्रामस्थांनी मागणी केली होती.त्यानुसार राज्य सरकारकडे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी पाठपुरावा केला होता.त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून वरील पुलाचे काम मंजूर कऱण्यात आले आहे.

या पुलामुळे अनेक गाव वाड्या जोडल्या जाणार असून नागरिकांना सोयीचे होणार आहे.यावेळी सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य,बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड,शिवाजी(दादा) गायकवाड,डाॅ.देवेंद्र डोके,पंचायत समिती सदस्य किरण घुले,शरद बसवंत,दिपक रोंगे,फुलचंद पालखे,अक्षय देसाई,डॉ.विलास लाडे तसेच चारे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…











