Wednesday, April 1, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शालेय जीवनापासून समाज सुधारण्याचे कार्य झाले पाहिजे – राज्यपाल हरीभाऊ बागडे

राजेश भोई by राजेश भोई
November 17, 2025
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शालेय जीवनापासून समाज सुधारण्याचे कार्य झाले पाहिजे – राज्यपाल हरीभाऊ बागडे
0
SHARES
4
VIEWS

पंढरपूर, “समाज सुधारण्याचे कार्य शालेय जीवनापासूनच सुरू झाले पाहिजे आणि या प्रक्रियेत पत्रकारांनी सक्रिय योगदान द्यावे,” असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल मा. हरीभाऊ बागडे यांनी केले. पंढरपूर येथे व्हॉइस ऑफ मीडिया व व्ही ओ एम नॅशनल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार कार्यशाळेत ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमास व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रमुख संदीप काळे, उद्योजक राणा सूर्यवंशी, वरिष्ठ पत्रकार संजय आवटे,इस्कॉन पंढरपूर अध्यक्ष प्रल्हाद प्रभू, श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज, इस्कॉन सिकंदराबादचे अध्यक्ष सहदेव प्रभू यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पत्रकार उपस्थित होते.

राज्यपाल बागडे यांनी भारतीय संस्कृतीच्या नैतिक मूल्यांचा गौरव करताना सांगितले की, “प्राचीन व मध्ययुगीन इतिहासकार, अभ्यासक आणि परकीय प्रवासी यांच्या लेखनातून भारतीय संस्कृती समृद्ध आणि नैतिक मूल्यांनी युक्त होती. इंग्रजांनी १८३५ मध्ये गुलामगिरी निर्माण करणारी शैक्षणिक पद्धती आणून या मूल्यांवर घाला घातला. मात्र, २०२० पासून केंद्र शासनाने शैक्षणिक धोरणात अमूलाग्र बदल करून नवसंस्कारित दिशा दिली आहे.” पत्रकारांच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना त्यांनी नारद मुनी यांचा उल्लेख ‘पहिले पत्रकार’ म्हणून केला आणि सांगितले की, “राष्ट्र, राज्य, शहर आणि गावाच्या विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी काम केल्यास समाजात सकारात्मक बदल घडतो.”

राज्यपालांनी प्रसारमाध्यम क्षेत्रातील विविध उदाहरणांचा दाखला देत पत्रकार समाज सुधारण्याच्या कार्यात कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात याचे विवेचन केले. त्यांनी नालंदा विद्यापीठाच्या आयुर्वेद शाखेचे उदाहरण देत प्राचीन भारतातील संशोधन वृत्ती आणि शिक्षणपद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. इंग्रजांच्या काळात गव्हर्नर मेकॉले यांच्या शैक्षणिक धोरणामुळे भारतीय मूल्यांवर परिणाम झाला, असेही त्यांनी नमूद केले. “पत्रकार समाजाचा आरसा असून, जनतेचे मत आणि गरजा राजकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य ते करतात,” असे सांगून त्यांनी व्हॉईस ऑफ मीडिया संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमात राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान मा. राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनिल मस्के यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात व समारोपही राष्ट्रगीताने करण्यात आला.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात आजपासून २ डिसेंबर दरम्यान कुष्ठरुग्ण अभियान राबविण्यार.. !

Next Post

हत्तुरे वस्ती येथे नियोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन संपन्न.

Related Posts

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान
सोलापूर जिल्हा

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक
सोलापूर जिल्हा

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
Next Post
हत्तुरे वस्ती येथे नियोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन संपन्न.

हत्तुरे वस्ती येथे नियोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025