सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त १२ ते १६ जानेवारी या कालावधीत नंदीध्वजांची मिरवणूक काढण्यात येते. यानिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिली. यात्रा कालावधीत श्री सिध्देश्वर मंदिर येथे सोलापूर जिल्ह्यातून तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील भाविक मोठ्या संख्येने येत असल्याने सदर वेळी वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता खालील मार्गावर जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांच्या मार्गात बदल करण्यात येत आहे.
१२ ते १६ जानेवारी या कालावधीत पुढील मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस जाण्यास व येण्यास बंदी करण्यात येत आहे. तसेच हिरेहब्बू यांच्या वाडयातून नंदीध्वज मार्गस्थ झाल्यावर नंदीध्वज जसजसे पुढे मार्गस्थ होतील त्या-त्या वेळी सदर मार्गावरील वाहतूक वळवण्यात येईल. त्यावेळी वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. पोलीस वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, दवाखान्याची वाहने, अग्निशामक, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, पॅरामिलीटरी फोर्स वाहने, व्ही. व्ही.आय. पी. वाहने, संरक्षित व्यक्तींची वाहने व पोलीस ज्या वाहनास परवानगी देतील अशी वाहने अपवादात्मक असतील. या आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- बंद करण्यात आलेले मार्ग
- विजापूर वेस ते पंचकट्टा
- लक्ष्मी मार्केट ते पंचकट्टा
- भारतीय स्टेट बँक ट्रेझरी शाखा (पूजा ऑफिस स्टेशनरी दुकान) ते पंचकट्टा
- भारतीय स्टेट बँक ट्रेझरी शाखा ते पार्क चौक
- मार्केट पोलीस चौकी ते पंचकट्टा
- पार्क चौक ते मार्केट चौकी
- ज्ञानप्रबोधिनी प्रशाला ते फडकुले सभागृह
- पर्यायी मार्ग
- विजापूर वेस ते बेगम पेठ पोलीस चौकी मार्गे
- विजापूर वेस ते बेगम पेठ पोलीस चौकी मार्गे
- पूनम चौक ते बेगमपेठ पोलीस चौकी मार्गे
- पूनम चौक- रंगभवन चौक सात रस्ता जुना एम्प्लॉयमेंट चौक डफरीन चौक पार्क चौक










