सोलापूर :- सोलापूर शहरात साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियमातील कलम १४२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व अबकारी अनुज्ञप्त्या दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पूर्ण दिवस बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.










