सोलापूर : देशभरात गेल्या वर्षभरामध्ये दि. १ सप्टेंबर २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत १९१ पोलीस अधिकारी व अंमलदार हे कर्तव्य बजावीत असताना शहिद झाले आहेत. त्यांच्या स्मरणानिमित्त मंगळवारी सकाळी पोलीस मुख्यालय सोलापूर शहर येथे मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले.

यावेळी सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ सुजित मिश्रा, पोलीस आयुक्त. एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपायुक्त गौहर हसन, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अन्य वरीष्ठ अधिकारी यांच्या हस्ते शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. राज्य पोलीस निरीक्षक बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली मानवंदना देण्यात आली. यावेळी सोलापूर शहरातील सर्व वरीष्ठ अधिकारी व अंमलदार, सोलापूर ग्रामीण पोलीस दल, केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्र व राज्य राखीव पोलीस बल गट क्रं. १०, सोलापूर येथील अधिकारी व अंमलदार तसेच शहिद जवानांचे कुटुंबीय व नागरीक उपस्थित होते








