वानवडी पोलिसांची जबरदस्त कारवाई
पुणे : मौजमजेसाठी पैसे मिळवण्याच्या उद्देशाने दुचाकी चोरणाऱ्या दोन विधीसंघर्षित बालकांना (अल्पवयीन मुले) वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे, वानवडी पोलीस ठाण्यातील ३ गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत.
२६ जानेवारी रोजी वानवडी पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, त्यांना गोपनीय बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया येथील मोकळ्या जागेत दोन तरुण संशयास्पद रित्या निळ्या आणि काळ्या रंगाच्या ॲक्टिव्हा गाड्या विकण्याचा प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सापळा रचून या दोन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे असलेल्या गाड्यांबाबत अधिक चौकशी केली असता, त्यांनी त्या गाड्या वानवडी परिसरातून चोरल्याची कबुली दिली. निळ्या आणि काळ्या रंगाची ॲक्टिव्हा: (MH 12 VN 8035)(MH 12 YY 5146) (MH 11 DW 8824) – ही गाडी त्यांनी चोरल्यानंतर ती पोलिसांची असल्याचे समजताच घाबरून पुन्हा फिर्यादीच्या घरासमोर नेऊन उभी केली होती.

यांनी केली कारवाई : सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या पथकातील अंमलदार दया शेंगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड व इतर कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.
उप-आयुक्त (परिमंडळ ५) श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहा. पोलीस आयुक्त श्रीमती नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली










