सोलापूर : हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचा आदेश विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिला.राजेश राजाराम आंबट (वय ३९, रा. न्यू सुनील नगर), व श्रीनिवास व्यंकटेश दासरी (वय ४३, रा. साईबाबा चौक) अशी त्या दोघांची नावे आहेत. या दोघांवर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाल्याने जेलरोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी विशेष कार्यकारी दंडाधिकारी कबाडे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता.

कबाडे यांनी या दोघांकडून चांगली वर्तणूक ठेवण्याच्या अटीवर २५ हजार रुपयांचे एक वर्ष मुदतीचे अंतिम बंधपंत्र घेतले होते. बंधपत्राच्या कालावधीत त्यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल झाल्याने त्यांना २५ हजार रुपये दंड भरण्याबाबतची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर कबाडे यांनी या दोघांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.










