चित्रकला स्पर्धा, सामाजिक उपक्रम व जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा
सोलापूर : ऑक्टोबर सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र. ५ मधील राजाभाऊ आलूरे व विनय ढेपे मित्र परिवाराच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नागेश कोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमांची सुरुवात गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी होणार असून, सकाळी १० वाजता बाळे येथील एन के किड्स स्कूल व ढेपे स्कूल येथे भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यानंतर शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता बाळे प्रभाग ५ मधील पूरग्रस्तांना दिवाळी फराळ व किराणा किट बवाटप कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
शनिवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने बाळे कॉर्नर ते अंबिका नगर रस्त्यावरील डिव्हायडरमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम पार पडणार आहे.
या सर्व उपक्रमांची सांगता रविवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या जिल्हास्तरीय भव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धेने होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष नजीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
बॉडी बिल्डर स्पर्धा एकूण सहा वजनी गटात होणार असून ५५ ६० ६५ ७० ७५ व ७५ च्या पुढील खुल्या गटात होणार आहेत या सर्व वजनी गटातून प्रथम येणाऱ्या क्रमांकास ११००० रुपये विजयश्री चषक व सन्मा पत्र देण्यात येणार आहे. आनंदभवर या पत्रकार परिषदेला राजाभाऊ आलूरे, विनय ढेपे, सुहास माने, श्रीमंत चव्हाण शिरिष सुरवसे, रतन क्षीरसागर अमोल झाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. या विविध उपक्रमांद्वारे समाजहिताचे कार्य घडवून आणत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्याची प्रेरणा समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.







