सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी भारतीय जनता पार्टीने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. महापौरपदासाठी भाजपचे नगरसेवक विनायक कोंड्याल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, उपमहापौरपदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचे नाव फायनल करण्यात आले आहे.


या निवडीमुळे सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘कोठे’ कुटुंबाचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे.विनायक कोंड्याल हे आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत. विशेष म्हणजे, मागील कार्यकाळात देवेंद्र कोठे यांच्या सासू श्रीकांचना यन्नम यांनी महापौरपद भूषवले होते. आता त्यांच्याच कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला, म्हणजेच विनायक कोंड्याल यांना ही संधी मिळत असल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे…..











