सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह पथकाच्या निधी अधीक्षकपदी उपशिक्षणाधिकारी (माध्यामिक) विठ्ठल ढेपे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यासंदर्भातील पत्र शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी काढले आहे. प्राथमिकचे वेतन पथक अधीक्षक सुनील दुधगांवकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता, मात्र ३० नोव्हेंबर २०२५ रोजी हे नियमवयोमानाने सेवानिवृत्त झाल्याने शासकीय सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

