कामगार संघटना कृती समिती, आरोग्य निरीक्षक संघटनेतर्फे महापौरांसह पदाधिकाऱ्यांचा सन्मान
सोलापूर : महानगरपालिका कामगार संघटना कृती समिती व सोलापूर महानगरपालिका आरोग्य निरीक्षक संघटना यांच्या मागण्यांबाबत लवकरच महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक आयोजित करून कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.
सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समिती व सोलापूर महानगरपालिका आरोग्य निरीक्षक संघटना यांच्या वतीने आज नूतन महापौर विनायक दादा कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे , स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, गटनेते वाहिदाबनो शेख , माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेवक गौतम कसबे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कामगार संघटना कृती समिती अध्यक्ष अशोक जानराव, आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत शिरसट, अजय क्षीरसागर, लिंबराज जेटीथोर, बाळी मेंडपु , बाबासाहेब क्षीरसागर, प्रदीप जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कामगार संघटनांच्या वतीने महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मान्यवरांना निवेदन देण्यात आले.










