८ मार्च ते २२ मार्च दरम्यानच्या जल महोत्सवास जिल्हयात उत्साहात प्रारंभ
सोलापूर ; ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करणे आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी दि.२२ मार्च २०२६ पर्यत जिल्हयात सर्व ग्रामपंचायत स्तरावर ‘जल महोत्सव २०२६’ उत्फुर्तपणे राबविण्यास सुरूवात झाली आहे.या महोत्सव अंतर्गत जिल्हयात जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी नारी नीर शक्ती दिवस महिला जल नेत्या/पाणी समिती सदस्यांचा सत्कार, महिलांकडून एफ.टी.के.च्या माध्यमातून पाणी गुणवत्ता तपासणी ,प्रात्यक्षिक “महिला नेतृत्व व जलसुरक्षा” विषयावर मार्गदर्शन आयोजीत करण्यात आले होते.




राज्यस्तरीय मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात जागतिक महिला दिन ८ मार्च २०२६ पासून जल महोत्सवास उत्साहात सुरूवात झाली आहे.सदरचा महोत्सव जागतिक जल दिन ८ मार्च ते दि.२२ मार्च २०२६ या दरम्यान आयोजीत करण्यात आला आहे.या महोत्सव अंतर्गत जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी जिल्हयात सर्व ग्रामपंचायत स्तरावर नारी नीर शक्ती दिवस महिला जल नेत्या/पाणी समिती सदस्यांचा सत्कार, महिलांकडू एफ.टी.के.किटच्या माध्यमातून पाणी गुणवत्ता तपासणी व प्रात्यक्षिक तसेच “महिला नेतृत्व व जलसुरक्षा” विषयावर मार्गदर्शन आयोजीत करण्यात आले होते.जल महोत्सव हा गाव, पंचायत समिती स्तरावर लोक जल उत्सव आयोजित केला आहे.जो पूर्णपणे लोकसहभागावर आधारीत असणार आहे.पिण्याच्या पाण्याला सांस्कृतिक आणि सामाजिक प्राधान्य देणे, स्थानिक जल उत्सव संस्थांत्मक करण्यासाठी प्रोत्साहित करणे,राज्य ते गावस्तरापर्यंत विविध विभागांमध्ये समन्वय साधणे, पाणी गुणवत्ता, सौर ऊर्जा आणि देखभाल दुरूस्तीसाठी दिर्घकालीन आराखडा तयार करणे, आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जलसेवेशी जोडणे हा जल महोत्सवाच्या उपक्रमामागचा उद्देश आहे.
जिल्हयातील ग्रामस्थांमध्ये पाणी पुरवठा यंत्रणा आधिक शाश्वत आणि मजबूत करण्यासाठी सामुदायिक लोकसहभाग वाढवण्यासाठी दि. ८ मार्च ते २२ मार्च २०२ या कालावधीत जल महोत्सव राबवला जात आहे.सदर जल महोत्सवाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व ग्रामपंचायत यांचे सहकार्य व सहभाग असणे अपेक्षित आहे.
अमोल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता )










