Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!

Solapur Mirror by Solapur Mirror
September 9, 2026
in शेती, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव शिवारात गेल्या सुमारे २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पाण्याअभावी उडीद, मूग, सोयाबीन, तूर आणि मका ही पिके करपली असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जमिनीला भेगा पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मशागत करून मोठा खर्च करत विविध पिकांची पेरणी केली होती. सुरुवातीला पिकांची वाढही समाधानकारक झाली. मात्र, ऐन वाढीच्या काळातच पावसाने दीर्घकाळ पाठ फिरवल्याने पिकांना पाण्याचा तीव्र ताण जाणवू लागला. परिणामी अनेक ठिकाणी पिके सुकून करपली आहेत. पाऊस लवकर न झाल्यास उर्वरित पिकेही हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

कासेगाव येथील शेतकरी संभाजी गाजरे यांनी दोन एकर क्षेत्रात उडीद पिकाची लागवड केली होती. मात्र, पावसाअभावी संपूर्ण पीक करपल्याने उत्पादन मिळण्याची आशाच संपुष्टात आली. अखेर हताश झालेल्या गाजरे यांनी उभ्या उडीद पिकावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटर फिरवला. पेरणी, बियाणे, खते, औषधे आणि मशागतीसाठी केलेला खर्चही वाया गेल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. कासेगावसह परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्यावी तसेच सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी गाजरे यांनी केली. “पिकांसाठी केलेला सर्व खर्च वाया गेला आहे. शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा. अन्यथा आर्थिक संकटामुळे शेतकरी अधिक अडचणीत सापडतील,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दोन एकरातील उडीद मातीमोल
पावसाच्या भरवशावर दोन एकरांत उडीद घेतला. मशागत, बियाणे, खते आणि औषधांसाठी मोठा खर्च केला. मात्र, गेल्या २० दिवसांपासून पाऊस नसल्याने पीक पूर्णपणे करपले. आता उत्पादनाची कोणतीही आशा राहिली नसल्याने उभ्या पिकावर रोटर फिरवावा लागला. प्रशासनाने प्रत्यक्ष बांधावर येऊन नुकसानीची पाहणी करावी आणि तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संभाजी गाजरे यांनी केली.

Previous Post

विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’

Next Post

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

Related Posts

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!
सोलापूर जिल्हा

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!

September 8, 2026
फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
Next Post
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In