Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

Solapur Mirror by Solapur Mirror
September 9, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : दिवसभर बातम्यांच्या शोधात धावपळ करणाऱ्या पत्रकारांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. उत्तम आरोग्य असेल तरच अधिक जोमाने आणि प्रभावीपणे कर्तव्य बजावता येते, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांनी केले. जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त होली स्पिरिट फिजिओथेरपी सेंटर आणि श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, जेसीएफए मिनिस्ट्री सोलापूरचे संस्थापक डॉ. डॅनियलपॉल यंगल, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, दैनिक ‘पुढारी’चे संपादक संजय पाठक, होली स्पिरिट फिजिओथेरपी सेंटरचे डॉ. राजेश सांगे आणि डॉ. प्रकाश सांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले, पत्रकार हे समाजातील महत्त्वाचा घटक असून ते दिवसभर विविध घटनांचे वार्तांकन करण्यासाठी धावपळ करीत असतात. या व्यस्त दिनचर्येत अनेकदा त्यांच्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पत्रकारांनी नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहणे आवश्यक आहे. पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. डॅनियलपॉल यंगल यांनी होली स्पिरिट फिजिओथेरपी सेंटरच्या उपक्रमाचे कौतुक केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात डॉ. राजेश सांगे यांनी शिबिरामागील उद्देश स्पष्ट केला. होली स्पिरिट फिजिओथेरपी सेंटरच्या वतीने समाजातील विविध घटकांसाठी आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. प्रकाश सांगे यांनी आभार मानले. यावेळी पत्रकार, छायाचित्रकार आणि कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous Post

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर जिल्हा

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!
शेती

पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!

September 9, 2026
विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’
सोलापूर जिल्हा

विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’

September 9, 2026
मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!
सोलापूर जिल्हा

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!

September 8, 2026
फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In