सोलपूर ; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर शाखा मोहोळ यांच्या वतीने सभासद आणि ग्राहकांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुभम कॉन्फरन्स हॉल, मोहोळ येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात संस्थेच्या सर्व सभासद आणि खातेदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थित सभासद आणि ग्राहकांशी संवाद साधताना संस्थेच्या विविध योजनांची माहिती मांडली तसेच पतसंस्थेतील प्रत्येक रुपयाची काळजी घेण्याचे आणि ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचे आश्वस्त केले. या दिवाळी फराळ उपक्रमाचा उद्देश संस्थेतील सभासद आणि ग्राहक यांच्यातील विश्वास, नातं आणि आपुलकी अधिक दृढ करणे हा होता.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सभासद आणि खातेदारांना दिवाळी फराळ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप स्नेहपूर्ण वातावरणात करण्यात आला. यावेळी सामाजिक बांधिलकी, पारदर्शकता आणि ग्राहकसेवा या तीन मूल्यांवर आधारित कार्यपद्धतीतून लोकमंगल पतसंस्था सातत्याने विश्वास संपादन करत असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मोहोळ येथील नेताजी प्रशालाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. महादेव आप्पाराव गायकवाड, विशेष अतिथी म्हणून CAREER MAKING GUIDANCE चे संस्थापक डॉ. राजकुमार आडकर, संस्थेचे सल्लागार डॉ. प्रमोद पाटील, डॉ. स्मिता पाटील, मोहोळचे पहिले नगराध्यक्ष रमेश बारस्कर, भाजपा तालुकाध्यक्ष सतीश काळे, तसेच पतसंस्थेचे संचालक शहाजी साठे,युवराज गायकवाड,चेअरमन गुरण्णा तेली, सरव्यवस्थापिका अलका देवडकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.










