तळागाळातील लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचविला पाहिजे – संदीप कारंजे
सोलापूर : विद्यार्थ्यांनी आयुर्वेद शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान संपादन करून तळागाळातील लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचविला पाहिजे तसेच त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत असे विचार शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयात 10 वा “राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे” औचित्य साधून आयोजित केलेल्या आयुर्वेद एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त उपायुक्त श्री. संदीपजी कारंजे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. वीणा जावळे, उपप्राचार्य डॉ. शांतीनाथ बागेवाडी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. भोजराज चौधरी यांची उपस्थिती होती.
भारत सरकारच्या निर्देशानुसार आयुर्वेदाबद्दलची जनजागृती करण्याचा उद्देशाने महाविद्यालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून आयुर्वेद एक्स्पो चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आपल्या दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या वस्तू, सौंदर्यप्रसाधने, घरगुती औषधे, विविध वनस्पतींची माहिती, प्रकृती परीक्षण, रक्तगट परीक्षण, तसेच विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना शारीर रचना व अवयवांची माहिती व्हावी या उद्देशाने मानवी अवयवांची प्रत्यक्ष पाहणी व्हावी व जनसामान्यांपर्यंत आयुर्वेद समजावा व आचरणात आणला जावा याविषयी आयुर्वेद एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते.

या आयुर्वेद एक्सपोला परिसरातील प्रतिष्टीत नागरिक व अनेक नामवंत शाळेच्या सुमारे 600 विद्यार्थ्यांनी भेट दिली व आयुर्वेदाबद्दलची माहिती जाणून घेतली.
या राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे औचित साधून मागील 10 दिवसापासून महाविद्यालयात विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करून लोकांमध्ये आयुर्वेदाबद्दलची जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन विविध स्पर्धा उपक्रम आरोग्य तपासणी शिबिर रॅली आदींच्या माध्यमातून महाविद्यालयात आयुर्वेदाबद्दल जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचा उद्देश व आयोजना मागील महत्व डॉ. गायत्री देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून करून दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. समृद्धी देसाई तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जयकुमार आडे यांनी केले यावेळी मोठ्या प्रमाणात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रशासकीय अधिकारी श्री. अनुप दोशी, विविध विभागाचे विभाग प्रमुख, द्वितीय वर्षाचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.







