सोलापूर : विजापूर रोडवरील एन बी ए पुर्नःमानांकन प्राप्त ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये दोन दिवसीय उद्योजकता जागरूकता शिबिर नुकतेच संपन्न झाले. विद्यार्थ्यांमध्ये नोकरी मिळवण्या ऐवजी आपणही “उद्योजक” व्हावे ही भावना रुजू करण्याच्या उद्देशाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजक बनण्यासाठी लागणाऱ्या विविध विषयांवर मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन डॉक्टर प्राजक्ता जोशी मॅडम, Prof. of Practice PIBM, Pune यांच्या हस्ते करण्यात आले व त्यांनीच शिबिरातील पहिले पुष्प गुंफले. आपल्या भाषणात “Basic Enterperenership & it’s Awarness” बाबत सखोल मार्गदर्शन केले.
दुसरा सत्रामध्ये विविध इंडस्ट्रीमध्ये विजिट नेण्यात आली. तिसरा सत्रामध्ये अनिश सहस्त्रबुद्धे यांनी उद्योजक बनण्यासाठी तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगितले. तसेच उद्योजक बनण्यासाठीची लागणारी पूर्वतयारी कशी असावी? उद्योजक बनल्यानंतर व्यवसायात येणाऱ्या अडचणींवर कसे मात करावे? आणि आपले व्यवहारिक दृष्टिकोन कसे असावे? याबद्दल मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रामध्ये श्री सुदीप उपाधे, मॅनेजर MSME Incubation Centre, सोलापूर यांनी आपल्या “कॉलेज जीवनातच स्टार्टअप कसा सुरु करावा, त्यामागे विचारधारा कशी असावी” हे सविस्तरपणे विद्यार्थ्यांना समजावले.
शिबिराचा शेवट Valedictory Function ने झाला. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिबिरामध्ये मिळालेली माहिती अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले आणि महाविद्यालयाचे आभार मानले. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. व्यासपिठावर श्री नितीन फलटणकर वरिष्ठ पत्रकार दैनिक दिव्य मराठी, शांती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री एस ए पाटील, उपाध्यक्ष श्री शिवानंद पाटील, कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम ए चौगुले, उपप्राचार्य श्री एस के मोहिते, EAC शिबिराचे समन्वयक प्राध्यापक श्री आर पी म्हता, EAC टीम मेंबर श्री जे जी मुल्ला, श्री एस ए बोगा, श्री पी ए बिराजदार, प्राध्यापिका कु. ए एस खरोसेकर व कु. ए के आहेरवाडी आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री जाहीद पिंजर व श्री जे जी मुल्ला यांनी केले तर आभार उपप्राचार्य श्री एस के मोहिते यांनी मानले. शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.







