सोलापूर ; पद्मशाली शिक्षण संस्था संचलित ,कुचन प्रशालेचा 82 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त व कुचन प्रशालेचे माजी विद्यार्थी पांडुरंग दिड्डी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे माजी उपमुख्याध्यापक बाळासाहेब कोर्टीकर व अरविंद चिन्नी उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.प्राचार्य युवराज मेटे यांनी प्रास्ताविकात कुचन प्रशालेच्या स्थापनेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती सांगितली…

बाळासाहेब कोर्टीकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना उज्वल यश मिळवा तसेच शाळेचा व पद्मशाली शिक्षण संस्थेचा गौरव होईल असेच आपले वर्तन ठेवा असे सांगितले. याप्रसंगी व्यावसायिक शिक्षण विभागाचे सांस्कृतिक प्रमुख नरेंद्र गुंडेली यांनी कुचन प्रशालेवर केलेली स्वरचित अमृत ही कविता सादर केली. अध्यक्षीय समारोपात पांडुरंग दिड्डी काका यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शाळेच्या नावलौकिकात आजी माजी पदाधिकारी, विश्वस्त, शिक्षक यांचे योगदान होते .याप्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगु ,प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे व सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख रुपाली क्षिरसागर यांनी केले.







