सोलापूर: मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागलेली होती. 11 सदस्य बिनविरोध निवडून आलेले होते. अध्यक्ष उपाध्यक्ष जनरल सेक्रेटरी व खजिनदार या चार पदासाठी निवडणूक लागली होती, 226 सभासदांपैकी 159 सभासदांनी मतदान केले. यामध्ये अध्यक्षपदासाठी मनोहर गणपत सपाटे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे, जनरल सेक्रेटरी पदासाठी महेश माने, खजिनदार पदासाठी महादेव गवळी यांना प्रत्येकी 121 मते मिळून चारही उमेदवार विजयी झाले. अशा प्रकारे शिवतीर्थ विकास पॅनलचे सर्वच्या सर्व 15 उमेदवार विजयी झाले अशी माहिती ज्ञानेश्वर सपाटे यांनी दिली आहे..








