सोलापूर: मजरेवाडी भागातील गजानन नगर मधील रहिवाशी आप्पाशा सदाशिव गायकवाड (मिस्त्री ) यांचे शनिवारी पहाटे 4:30 वाजता दुःखद निधन झाले. ते 76 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दिव्य मराठीचे उपसंपादक, कवी विजय गायकवाड यांचे ते वडील होत. त्यांच्यावर मोदी स्मशानभूमीत दुपारी 3. 30 वाजता अंत्यसंकर होईल.







