पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे दि. १७ नोव्हेंबर रोजी सद्गुरू श्री सीताराम महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा होत आहे. नाम सप्ताहात सकाळी काकडा आरती, भजन, दुपारी आरती, महानैवेद्य होणार आहे. दुपारी १२ वाजता समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती समाधी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त हरीभाऊ कुलकर्णी व अध्यक्ष दीपक रोंगे यांनी दिली.


विश्वस्त भागवत केसकर, विकास कुलकर्णी, उमेश परिचारक तसेच सरपंच मनिषा सव्वाशे, उपसरपंच शरद रोंगे, ग्रामसेवक बी.व्ही. कुलकर्णी, बंडुलाल पठाण, अण्णा कावरे, प्रभू गायकवाड, हुसेन मुलाणी आदींच्या उपस्थितीत या सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यंदा पुण्यतिथी सोहळा अमावस्या व गुरुवारसह चार दिवस चालणार आहे. यात्रा कालावधीत पंढरपूर व सांगोला येथून विशेष एस.टी. गाड्यांची सोय करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत चोख बंदोबस्त ठेवणार असल्याची माहिती तालुका पोलीस निरीक्षक टी. आय. मुजावर यांनी दिली. या सोहळ्या दरम्यान, राज्यभरातून हजारो भाविक येत असतात. यानिमित्ताने मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे







