सोलापूर – येथील अखिल भारतीय प्रबुध्द नाटय परिषदेच्या विद्यमाने प्रबुध्द रंगभूमी सोलापूर आयोजित शुक्रवार दि 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृह (एस सी) येथे सत्यशोधक म. जोतीबा फुले फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये सत्यशोधक गिते, सावित्रीमाईंची ओवी, सावित्रीमाईंच्या कविता, पत्रलेखन अभिवाचन, मी सावित्रीमाई फुले बोलतेय प्रबुध्द नाटय व राज्यस्तरीय प्रबुध्द पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती या कार्यक्रमाचे संयोजक अभिनेते डॉ किर्तीपाल गायकवाड यांनी पत्रकाव्दारे दिली.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ नसिमा पठाण, योगीराज वाघमारे (जेष्ठ साहित्यीक) डॉ एम. डी. शिंदे, प्रा. प्रमोद लांडगे, सुशिला वनसाळे (सिने अभिनेत्री) प्रमोद सरवदे (सिने अभिनेते) आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भारतीय दलित पँथरचे प्रदेश अध्यक्ष अंबादास शिंदे सर यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या सत्यशोधक फेस्टिव्हलचे उदघाटन प्रवृध्द सांस्कृतिक चळवळीचे प्रवर्तक व ऐतिहासिक धम्मभुमीचे विकास प्रणेते भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भीमपुत्र टेक्सास गायकवाड लिखित क्रांतीसुर्य जोतीबा फुले (प्रबुध्द जलसा) डॉ किर्तीपाल गायकवाड लिखित, एकच स्वप्न प्रबुध्द भारत या ग्रंथाचे आणि बुध्दीस्ट थिएटर या धम्मचक्र अनुवर्तनदिन विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये सोलापूरातील व राज्यतील प्रबुध्द रंगभुमीचे कलावंत, डॉ श्रध्दा सनमडीकर, संजय सायरे, प्रा. प्रियांका सितासावद (मुंबई विद्यापीठ), प्रा डॉ संजय लांडगे, कल्याण श्रावस्ती, यु एफ जानराव, सुनिता गायकवाड, प्रा. शंकर खळसोडे, प्रा जीवन शिंदे आदि मान्यवर सहभागी होणार आहेत.
या फेस्टिव्हल मधील पुरस्कार प्राप्त कलावंत असे आहेत. युगकवी वामन कर्डक प्रबुध्द गीतकार गायक पुरस्कार (भीमशाहीर संदिप शिंदे मरणोत्तर), भदन्त अश्वघोष प्रबुध्द नाटककार पुरस्कार (भानुदा जीवणे नागपुर), डॉ आंबेडकर प्रबुध्द गंथकार पुरस्कार (राजीव शिंदे पुणे), क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रबुध्द अभिनेत्री पुरस्कार (प्रा प्रियंका सितासावद मुंबई विद्यापीठ), डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रबुध्द पत्रकार पुरस्कार (राहुल खांडेकर पुणे), डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रबुध्दनायक पुरस्कार (प्रबुध्द साठे पुणे), बॅरिस्टर डॉ आंबेडकर विधीज्ञ पुरस्कार (अँड डॉ बाबा वानखेडे अकोला), क्रांतीबा ज्योतीबा फुले प्रबुध्द सिने दिग्दर्शक पुरस्कार (आनंद कुमार सरवदे सोलापूर)या सत्यशोधक फेस्टिव्हलला बहुजन जनतेची व कलावंत कार्यकत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीचे अक्षय बबलाद, कल्याण श्रावस्ती,, फारुख शेख, यु एफ जानराव, प्रा. शंकर खळसोडे, मारुती बेलभंडारे आणि प्रा जीवन शिंदे यांनी केले आहे.







