Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा!

Solapur Mirror by Solapur Mirror
November 27, 2025
in सोलापूर शहर
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा!
0
SHARES
279
VIEWS

​प्रा.डॉ. विकास पाटील यांना प्रतिष्ठेचा ‘इंडो-थाई रिचर्ड फॅनमॅन एक्सलन्स पुरस्कार जाहीर

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. विकास पाटील यांना इंडो-थाई रिचर्ड फॅनमॅन एक्सलन्स पुरस्कार २०२६ हा अत्यंत प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. नॅनो मटेरियल या क्षेत्रात त्यांनी केलेल्या अतुलनीय आणि उत्कृष्ट संशोधनासाठी त्यांना हा सन्मान मिळणार आहे.

​हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय मल्टी डिसिप्लिनरी रिसर्च फाउंडेशन इंडिया-थायलंड यांच्याकडून दिला जातो. विशेष म्हणजे, हा पुरस्कार नोबेल विजेते आणि जगात सर्वप्रथम नॅनोटेक्नॉलॉजीची संकल्पना मांडणारे महान शास्त्रज्ञ रिचर्ड फॅनमॅन यांच्या नावाने दिला जातो. यामुळे या पुरस्काराचे महत्त्व अधिक वाढले आहे. ​प्रा. पाटील हे गेली सत्तावीस वर्षाहून अधिक काळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये नॅनो मटेरियल या विषयावर अथक संशोधन करत आहेत. या काळात त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन निबंध प्रकाशित केले असून विविध पेटंट्स आणि संशोधन प्रकल्पही यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. त्यांच्या या भरीव कार्याची दखल घेत IMRF, थायलंड व भारत यांनी त्यांना या पुरस्कारासाठी निवडले आहे.

१६ डिसेंबर २०२५ रोजी थायलंडमध्ये वितरण
​हा सन्मान सोहळा दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी थायलंड येथील राजभट राजन गरींद्र विद्यापीठ येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत संपन्न होणार आहे. प्रा. पाटील यांना हा पुरस्कार स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल अशा स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे. ​प्रा. डॉ. विकास पाटील यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल पुण्यश्लोक सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र. कुलसचिव डॉ. अतुल लकडे, वित्त व लेखा अधिकारी सीए डॉ. महादेव खराडे, सर्व संकुलांचे संचालक, उपकुलसचिव डॉ. सूर्यकांत कांबळे, सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, तसेच सर्व शिक्षकवृंद आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous Post

महात्मा फुले स्मृतीदिनी सोलापूरात महात्मा जोतीबा फुले फेस्टीवलचे आयोजन..!

Next Post

हुतात्मा, इंद्रायणी एक्स्प्रेस जानेवारीत १० दिवस रद्द

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
हुतात्मा, इंद्रायणी एक्स्प्रेस जानेवारीत १० दिवस रद्द

हुतात्मा, इंद्रायणी एक्स्प्रेस जानेवारीत १० दिवस रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025