सोलापूर : स्व. विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे मेमोरियल ट्रस्ट संचलित डॉ. कोठेज् हॉस्पिटल यांच्या वतीने प्रसिब्द गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामदैवत श्री शिवयोगी सिब्दरामेश्वर मंदिर परिसरातील गोरगरीब व बेघर नागरिकांना कुमारी कौशिका सूर्यप्रकाश कोठे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाली व ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, शशिकांत कैंची, प्रभु कोठे, अजय पोन्नम, संतोष सोमा, स्वरांजली न्यूजचे संपादक दयानंद मामडथाल, व्यंकटेश चिलका, नवनीत चिलका, रोहित हंचाटे, संभाजीराव शिंदे प्रशालेचे माजी प्राचार्य अंबादास चाबुकस्वार, अंदेवाडी आप्पा, सूर्यकांत जिंदम, छत्रपती अवशेट्टी, प्रा. जीवन यादव, प्रा. लक्ष्मण महाडिक, सदाशिव पवार, रविशंकर कोटा, श्यामप्रसाद गंजी, भीमाशंकर गायकवाड, ऋषी आळंद, वैभव रंपुरे, आदित्व महिंद्रकर, बालकृष्ण इप्पाकायल, गोविंद चिंता, कोठे परिवारातील सदस्य, चिलका परिवारातील सदस्य तसेच इतर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.










