Saturday, January 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पालकमंत्र्याला नाकारले ; जिल्ह्याने दिला भाजपाला दणखा.

राजेश भोई by राजेश भोई
December 21, 2025
in महाराष्ट्र, राजकारण, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
पालकमंत्र्याला नाकारले ; जिल्ह्याने दिला भाजपाला दणखा.
0
SHARES
246
VIEWS

धैर्यशील मोहिते पाटील यांची जादू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही कायम

सोलापूर ; नुकत्याच झालेल्या नगरपंचायत नगर परिषदांच्या निवडणूक निकालांमध्ये सोलापूर जिल्ह्याने लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपाला नाकारलेले स्पष्टपणे दिसत असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील नाराजीचा सूर भाजपाच्या पराभवात स्पष्टपणे दिसत आहे. नगरपरिषद नगरपंचायत चा निकाल जाहीर झाला यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 12 नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या होत्या. यामध्ये भाजपाला केवळ चारच नगरपरिषदा आपल्याकडे ठेवता आल्या पंढरपूर सारखी नामवंत नगरपरिषद भाजपाला गमवावी लागली आहे.

स्थानिक विकास आघाडी ,तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांनी बाजी मारलेली दिसत आहे त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट तीन ठिकाणी विजयी झालेले आहेत तर अकलूज आपल्या ताब्यात ठेवण्यात मोहिते पाटलांना यश मिळाले आहे. येथे दहशतीचा मुद्दा राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लावून धरला होता त्याला जनतेने त्यांचा पराभव करून उत्तर दिलेले दिसते आहे.संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर भाजपाची सत्ता आणण्यासाठी भाजपाने एक हाती कार्यक्रम राबविले होते. यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पावर दिली पण त्यांनी एकाधिकारशाही दाखवत स्थानिक नेतृत्वांना विश्वासात न घेता आपले निर्णय लादले त्यामुळे भाजपात खदखद निर्माण झाली आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

एकूणच जिल्ह्यात प्रचार करत असताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निधी अडवण्याचे कटकारस्थान केले व स्थानिक राजकारणात ढवळाढवळ करत स्थानिक नेतृत्वांना नाकारत आपलेच निर्णय त्यांच्यावर लादले त्यामुळे भाजपाला सपशेल अपयश मिळालेले दिसत आहे.पंढरपूर सारखी महत्त्वाची नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी लक्ष घालून होते. तिथे निर्णय अधिकार माजी आमदार प्रशांत मालक यांनाच मिळायला हवे होते पण तसे न होता पालकमंत्री गोरे यांनीच सर्व सूत्रे हातात घेतल्यामुळे चांगले असणारे वातावरण पूर्णतः बिघडून गेले. आणि हातची नगरपरिषद भाजपाला गमवावे लागले.

सांगोला मध्ये देखील महायुतीतील घटक असणाऱ्या शहाजीबापू पाटलांना एकाकी पाडण्याचा प्रयोग पालकमंत्र्यांनी केला त्यामुळे जनता जनार्दनाने पालकमंत्र्याला पराभव करून त्यांची जागा दाखवून दिली. तिथेही भाजपाची सत्ता येऊ शकली असती. अकलूज मध्ये भाजपाने माजी आमदार राम सातपुते यांना पावर दिली आणि त्यांनी पालकमंत्र्यांना आणून अनेक सभा ठोकल्या आणि त्यातून दहशत गुंडागर्दी असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला त्यालाही जनतेने त्यांचा पराभव करून ठोस उत्तर दिले.सातपुते यांना पावर देऊन निवडणुकीला भाजपा सामोरे गेली खरी पण त्यांची कोणतीच जादू अकलूज मध्ये दिसली नाही. भाजपाचे जे चार उमेदवार निवडून आलेले आहेत ते त्यांच्या वैयक्तिक पातळीवर आलेले दिसतात त्यांच्या विजयामध्ये सातपुते यांचा कणभरही वाटा दिसत नाही . त्यामुळे अकलूज नगर परिषद राजकीय नेतृत्व बदलून भाजपाला आपल्या ताब्यात ठेवणे सहज शक्य झाले असते पण पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राम सातपुते यांनी घोळ केला आणि भाजपाला आपल्या सहजपणे ताब्यात येईल अशी हक्काची असणारी अकलूज नगर परिषद गमवावी लागली.

अक्कलकोट ,मैंदर्गी ,बार्शी ,अनगर या ठिकाणी भाजपाची सत्ता आली असली तरी त्यामध्ये पालकमंत्र्याचे योगदान नाही हे स्पष्टपणे दिसते. स्थानिक पातळीवरील नेते मंडळींच्या ताकदीमुळे या नगरपरिषद निवडणुकीत विजय मिळलेला दिसतो आहे.तीर्थक्षेत्र विकास आघाडी, स्थानिक विकासा आघाडी यांना ताकद देण्याचा प्रयत्न खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला. त्यामुळे भाजपाची पळता भुई थोडी झाली. पालकमंत्र्याविषयी असंतोषाची लाट होतीच त्यात शरद पवार राष्ट्रवादीने अचूक ताकद देत विजयाला गवसणी घालण्यास मदत केली त्यामुळे मंगळवेढा करमाळा पंढरपूर जिंकण्यात यश मिळाले आणि भाजपाला या नगरपरिषदा गमवाव्या लागल्या. दुधनी, सांगोला ,मोहोळ यामध्ये शिवसेना शिंदे गटाचा चमत्कार पाहायला मिळाला तोही भाजपाच्या

असंतोषातूनच…

पालकमंत्र्यांच्या ब्लॅकमेलिंग धोरणाला कंटाळलेल्या जनतेने शिंदे गटांच्या पदरात दुधनी,सांगोला, मोहोळ टाकले. कुर्डूवाडी शिवसेना ठाकरे गटाचा विजय देखील भाजपा विषय असणाऱ्या तीव्र भावनेमुळेच साकार झाला. एकूणच पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सपशेल अपयशी ठरलेले दिसत असून बाहेरील नेतृत्वांना सोलापूर जिल्हा मान्यता देत नसल्याचे चित्र निमित्ताने पुढे आले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्र्याची वाढलेली लुडबुड आणि माळशिरस तालुक्याच्या राजकारणात सातपुतेंची वाढलेली एकाधिकारशाही लोकांना आवडलेली दिसत नाही त्यामुळेच लोकांनी या बाहेरील नेतृत्वांना फटका करून पुन्हा एकदा जिल्ह्याचा स्वाभिमान दाखवून दिला आहे असेच या निकालाचे वर्णन आहे.

Previous Post

मैंदर्गी नगरपरिषदेवर ;अंजली बाजारमठ २४७७ मतांनी विजयी

Next Post

सोलापुरात श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने यंदाही कृषी प्रदर्शनाचे आयोजन..

Related Posts

जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..
सोलापूर जिल्हा

जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

January 31, 2026
प्रजासत्ताक दिनी रेल्वे गेट बंद ठेवल्याने आ.सुभाष देशमुख आक्रमक;  DRM कडे केली तक्रार..
सोलापूर जिल्हा

प्रजासत्ताक दिनी रेल्वे गेट बंद ठेवल्याने आ.सुभाष देशमुख आक्रमक; DRM कडे केली तक्रार..

January 30, 2026
दहावी, बारावीच्या परीक्षा कालावधीत दक्षता घेण्याचे आवाहन ; शिक्षणाधिकारी सचिन जगताप
सोलापूर जिल्हा

दहावी, बारावीच्या परीक्षा कालावधीत दक्षता घेण्याचे आवाहन ; शिक्षणाधिकारी सचिन जगताप

January 30, 2026
अजित दादांना मी खूप जवळून पाहिलय जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी..!
सोलापूर जिल्हा

अजित दादांना मी खूप जवळून पाहिलय जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी..!

January 30, 2026
मोक्का’ प्रकरणातील विकास भोसले यांना जिल्हा सत्र न्यायालयाने केले जामीन मंजूर..!
सोलापूर जिल्हा

मोक्का’ प्रकरणातील विकास भोसले यांना जिल्हा सत्र न्यायालयाने केले जामीन मंजूर..!

January 30, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली आदरांजली
राजकारण

सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली आदरांजली

January 30, 2026
Next Post
सोलापुरात श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने यंदाही कृषी प्रदर्शनाचे आयोजन..

सोलापुरात श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने यंदाही कृषी प्रदर्शनाचे आयोजन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

January 31, 2026
प्रजासत्ताक दिनी रेल्वे गेट बंद ठेवल्याने आ.सुभाष देशमुख आक्रमक;  DRM कडे केली तक्रार..

प्रजासत्ताक दिनी रेल्वे गेट बंद ठेवल्याने आ.सुभाष देशमुख आक्रमक; DRM कडे केली तक्रार..

January 30, 2026
दहावी, बारावीच्या परीक्षा कालावधीत दक्षता घेण्याचे आवाहन ; शिक्षणाधिकारी सचिन जगताप

दहावी, बारावीच्या परीक्षा कालावधीत दक्षता घेण्याचे आवाहन ; शिक्षणाधिकारी सचिन जगताप

January 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025