Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापुरात श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने यंदाही कृषी प्रदर्शनाचे आयोजन..

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
December 24, 2025
in शेती, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापुरात श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने यंदाही कृषी प्रदर्शनाचे आयोजन..
0
SHARES
101
VIEWS

सोलापूर : श्री सिद्धेश्वर देवस्थान यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवत असून यंदा प्रदर्शनाचे 55 वे वर्ष आहे. या निमित्ताने होम मैदान येथे 25 ते 29 डिसेंबर 2025 या 5 दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या कृषी प्रदर्शनात 300 स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद सोलापूर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्याने व स्मार्ट एक्स्यो ग्रुप च्या व्यवस्थापन अंतर्गत भरविण्यात येत आहे.

तसेच कृषी संशोधन केंद्र, सोलापूर डाळिंब संशोधन केंद्र, रब्बी ज्वारी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र सोलापूर व मोहोळ दिमाग, रेशीम खादी ग्रामोद्योग, पशुसंवर्धन, सामाजिक वनीकरण व राष्ट्रीयकृत बँका, नाबार्ड, कृषी महाविद्यालय, कृषी स्टार्टअप उद्योजक, नवा उद्योजक, कृषी यांत्रिकीकरण, फळ रोपवाटिकाधारक, साखर कारखाने यांच्या सहभागाने आयोजित केले जाणार आहे.

सदर प्रदर्शन नियोजनबध्द व यशस्वीरित्या व्हावे तसेच कृषी प्रदर्शनाची माहिती जिल्ह्यातील शेतकरी बांधवापर्यंत पोहचावी याकरीता आज दि. 22 डिसेंबर 2025 रोजी पत्रकार परिषदचे आयोजन करून सर्व प्रसार माध्यमांच्या सहकार्याने माहिती देण्यात येत आहे. तरी श्री सिध्देश्वर कृषी प्रदर्शनात सर्व शेतकरी बांधव, उद्योजक व नागरिकांनी सहभागी होवून कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,

दरम्यान, या प्रदर्शनात रोझ क्लब सोलापूर यांचे विशेष सहकार्यातून भव्य राज्यस्तरीय गुलाब पुष्प प्रदर्शन, ५०० हून अधिक विविध गुलाब पुष्प एकाच ठिकाणी पाहण्यास मिळणार आहेत. महाराष्ट्रातील सोलापूर, नाशिक, पुणे बाएफ संस्था यांचेकडील शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेले ५०० प्रकारचे दुर्मिळ देशी बी-बियाणे प्रदर्शित करणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना विक्रीसाठीही उपलब्ध असणार आहेत.दि.२६ डिसेंबर रोजी गाय, बैल, वासरू, म्हैस अशा विविध पशु प्रजाती तसेच देशी गोवंश मधील विविध प्रजातीचे भव्य प्रदर्शन व स्पर्धा. दि.२७ डिसेंबर रोजी ३५ हून अधिक विविध देशी व विदेशी प्रजातींच्या श्वानांचे प्रदर्शन (डॉग-शो) व कॅटशो स्पर्धा. तसेच याचदिवशी पुष्प रचना स्पर्धा. दि.२८ डिसेंबर रोजी विविध प्रकारचे पाळीव मांजरांचे प्रदर्शन व स्पर्धा संपन्न होणार आहेत. या भव्यदिव्य प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेस नीलकंठ कोनापुरे, गुरुराज माळगे, विश्वनाथ लब्बा, मल्लिनाथ मसरे, विलास कारभारी, विजयकुमार बरबडे, पशुपती माशाळ, रतन रिक्के आदींसह पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

प्रदर्शनात या गोष्टी पहावयास मिळणार..!

1) शेतकऱ्यांना शेतातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती, कृषी यांत्रिकीकरण, दुग्धोत्पादन, रेशीम पीक, मधुमिक्षका पालन, फलोत्पादन तसेच कृषी उद्योजक निविष्ठा, नवीन स्टार्टअप व्हर्टिकल फार्मिंग, आधुनिक कृषी अवजारे इत्यादी विषयी सविस्तर माहिती पोहचण्यास सुलभहोईल.

2) महाराष्ट्रातील सोलापूर, नाशिक, पुणे बाएफ संस्था यांचेकडील शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेले अंदाजे 500 प्रकारचे दुर्मिळ देशी बी-बियाणे प्रदर्शित करणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना विक्रीसाठीही उपलब्ध असणार आहेत.

3) दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत गाय, बैल, वासरू, म्हैस अशा विविधन पशु प्रजाती तसेच देशी गोवंश मधील विविध प्रजाती चे भव्य प्रदर्शन व स्पर्धा,

4) दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत 35 हून अधिक विविध देशी व विदेशी प्रजातींच्या श्वानांचे प्रदर्शन (डॉग-शो) व स्पर्धा. तसेच याचदिवशी सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 पर्यंत पुष्प रचना स्पर्धा.

5) दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 3.00 पर्यंत विविध प्रकारचे पाळीव मांजरांचे प्रदर्शन व स्पर्धा.

6) रोज क्लब सोलापूर यांच्या विशेष सहकार्यातून भव्य राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन 500 हुन अधिक विविध प्रकारचे गुलाब एकाच ठिकाणी पहावयास मिळणार..!

प्रदर्शनाचे आकर्षण

या भव्यदिव्य प्रदर्शनात ३०० हून अधिक शेतीविषयक कंपन्यांचा सहभाग असणार आहे. भारतातील विविध कंपन्याचे ट्रॅक्टर्स व शेती अवजारे एकाच ठिकाणी शेतकरी बांधवांना पाहण्याची संधी, वाहन महोत्सव, शेती विषयक प्रक्रिया उद्योग, महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या, शेतकऱ्यांसाठी सर्व योजनांची माहिती देणारी दालने, केवळ २० मिनिटांमध्ये १ एकर क्षेत्राची फवारणी करणारे रिमोट ऑपरेटेड ड्रोनचे लाईव्ह प्रात्यक्षिक व शेतकरी बांधवांना फवारणी क्षेत्रातील उद्योग करण्यासाठी उपयुक्त असा ड्रोनचे दालन, रोझ क्लब सोलापूर यांचे विशेष सहकार्यातून भव्य राज्यस्तरीय गुलाब पुष्प प्रदर्शन, ५०० हून अधिक विविध गुलाब पुष्प एकाच ठिकाणी पहावयास मिळणार आहे, सेंद्रीय शेतीचे विशेष दालन, होम गार्डन किटचे लाईव्ह प्रात्यक्षिक,भाजीपाला रोपवाटिका व विविध दुर्मिळ अशा प्रजातींचे दालने, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचे लाईव्ह प्रात्यक्षिक, दुर्मिळ देशी ५०० हून अधिक बियाण्यांचे प्रदर्शन व विक्री, तांदूळ महोत्सव, परदेशी भाजीपाला प्रदर्शन, सौर ऊर्जा विषयक दालने यासह जगातील सर्वात लांब १५ इंच लांब गव्हाची लोम्बी आणि कुदरत १७ ही देशी बियाण्यांचे प्रदर्शन व विक्री असणार आहे.

– गुरुराज माळगे, अध्यक्ष श्री सिद्धेश्वर कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन समिती 

Previous Post

पालकमंत्र्याला नाकारले ; जिल्ह्याने दिला भाजपाला दणखा.

Next Post

मविआचा निर्णय पक्का; आज सायंकाळी होणार स्पष्ट चित्र..!

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
मविआचा निर्णय पक्का; आज सायंकाळी होणार स्पष्ट चित्र..!

मविआचा निर्णय पक्का; आज सायंकाळी होणार स्पष्ट चित्र..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025