सोलापूर : प्रभाग क्रमांक 15 येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ जुनी मिल आयोजित केलेल्या सभेत आमदार देवेंद्र कोठे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भरसभेत फोन करत प्रभागात असलेल्या जुनी मिल चाळ, लक्ष्मी चाळ,पाटील चाळ, लक्ष्मी विष्णू चाळ, वारद चाळ, एनजी मिल चाळ,जुनी पोलीस लाईन, धरमशी लाईन यासह मुरारजी पेठ येथील अन्य कामगारांच्या चाळी व मिळकतींवरती चुकीच्या प्रकारे B-2(सत्ता प्रकार ब) लागल्या मुळे कामगारांच्या चाळींचा पुनर्विकास रखडल्याची बाब निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार आचारसंहिता नंतर तातडीने बैठक लावून हा विषय एकही रुपये शासकीय कर न घेता पूर्णपणे निकाली काढून देण्याचा शब्द महसूल मंत्री बावनकुळे यांनी सभेमध्ये दिला.










