जुळे सोलापूर चा महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..
सोलापूर: सोलर सिस्टीमच्या मंजुरीसाठी लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन हजार रुपयांची अमित विलासराव रेडेकर (वय ४२ वर्ष) सहाय्यक अभियंता (श्रेणी-२), महावितरण शाखा कार्यालय जुळे, सोलापूर. यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदाराने त्यांच्या घरावर ३.५ किलो वॅटची सोलर सिस्टीम बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. या अर्जाला मंजुरी देण्याचे काम सहाय्यक अभियंता अमित रेडेकर यांच्याकडे होते. या कामासाठी रेडेकर यांनी प्रति किलो वॅट १,००० रुपये याप्रमाणे ३,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अर्ज केला असता २३ जानेवारी ला पडताळणी केल्यानंतर, २४ जानेवारी रोजी दुपारी चार
जुळे सोलापूर येथील महावितरण शाखा कार्यालय जुळे, सोलापूर. वाजता सापळा लावणात आला होता. यावेळी जुळे सोलापूर येथील कार्यालयात तक्रारदाराकडून ३,००० रुपये स्वीकारताना रेडेकर यांना ताब्यात घेण्यात आले. विजापूर नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी दिली आहे..










