सोलापूर – तृतीयपंथीयास आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या प्रियकराचा जामीन न्यायालयाने फेटाळला असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील ऍड. प्रदिपसिंग राजपूत यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली. यात थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी यांचा भाऊ प्रकाश व्यंकप्पा कोळी वय 22 वर्षे हा लहानपणापासून मुलींसारखा वागत होता. तो इतर तृतीय पंथीयासोबत राहात, फिरत असे. लोक त्यास स्वीटी या नांवाने ओळखत होते. मयत प्रकाश उर्फ स्वीटी हा त्याच्या परिवारासोबत वैद्यवाडी, सोलापूर येथे भाडयाने राहात असताना त्याची ओळख आरोपी सुजित आप्पासाहेब जगादार याच्या सोबत झाली होती व त्यातून त्यांचे प्रेम संबंध निर्माण झाले होते. आरोपी सुजित याने मयत प्रकाश उर्फ स्विटी यास “मी, आयुष्यभर तुझ्यासोबतच राहणार आहे, मी तुझ्याशीवाय इतर कोणाबरोबर लग्न करणार नाही” असे सांगीतले होते.
तसेच त्या दोघांनी सुमारे दीड ते दोन वर्षापूर्वी लग्न केल्याबाबतचा व्हीडीओ बनवला होता. त्यानंतर आरोपी सुजीत जमादार याने प्रकाश उर्फ स्वीटी यास वेगळी भाडयाने खोली करुनदिल्याने प्रकाश हा मड्डी वस्ती, सोलापूर येथे व त्यानंतर पाच ते सात महिन्यापासून बाळे येथे भाडयाने राहात होता. त्या दरम्यान आरोपी सुजित जमादार हा यातील प्रकाश उर्फ स्वीटी यांच्या खोलीवर नेहमी येजा करीत होता.
दि.04/12/2025 रोजी रात्री प्रकाश उर्फ स्वीटी याने फिर्यादी यांचे व्हॉटसअॅप मोबाईलवर मी फाशी घेवून आत्महत्या करीत असून, माझ्या मृत्यूस सुजित जमादार हा कारणीभूत व जबाबदार आहे असा रडत असल्याचा व्हीडीओ पाठविला. फिर्यादी यांची बहीण ज्योती हीने फिर्यादीचा मित्र राम गायकवाड याच्या मोबाईलवर फोन करुन तुम्ही जवळच राहण्यास असल्याने प्रकाश हा फाशी घेत असून त्यास क़त्यापासून रोखण्यास सांगितले.
फिर्यादी प्रकाशच्या घरी पोहोचले तेंव्हा राम गायकवाड यांनी प्रकाश याचा गळफास सोडवून त्यास खाली झोपवलेले दिसले. फिर्यादी यांनी १०० नंबरवर फोन करुन घटनेची माहिती दिल्याने पोलीस व अॅम्ब्युलन्स येवून त्यारा उपचाराकरिता सिव्हील हॉस्पिटल मध्ये घेवून गेले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासून तो गयत झाल्याबाबत कळविले. नंतर फिर्यादी यारा राम गायकवाड यांनी सांगितले की, सुजित याने लग्नाचा स्टेटस ठेवले असल्याचे कारणामुळे प्रकाश व आरोपी सुजित यांच्यात वाद झाल्याचे सांगितले होते.
आरोपीच्या वतीने एस. व्ही. केंद्रे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश, सोलापूर यांच्या न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या जामीन अर्जास सरकार पक्षातर्फे लेखी म्हणणे सादर करुन जोरदार हरकत घेण्यात आली व सरकार पक्षातर्फे गयताने मृत्यूपूर्वी काढलेले व्हीडीओ रिल्स न्यायालयात सादर केले व त्यारा मृत्यूपूर्वी जबाब म्हणून ग्राहय धरण्याबाबत विनंती केली की, या व्हीडीओ मयताने. त्यांच्या आत्महत्येस आरोपीच जबाबदार असल्याचे कथन केले होते. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील अॅड. डॉ. प्रदीपसिंग गो. राजपूत यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन, आरोपीचा जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळुन लावला आहे. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील अॅड. डॉ. प्रदीपसिंह मो. राजपूत यांनी व आरोपीतर्फे अॅड. संतोष न्हावकर यांनी काम पाहिले










