सोलापूर पुणे ; पश्चिम महाराष्ट्र विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र विभागीय नियोजन आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र विभागातील पक्षाची संघटनात्मक रचना, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक नियोजन या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मतदारसंघनिहाय नियोजन, संघटनात्मक बळकटी या विषयांवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्षाच्या प्रत्येक पातळीवरील समन्वयातून एकजुटीच्या बळावर यश मिळवावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या बैठकीस ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहिले.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत दादा पाटील,मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री अशोक उईके, मंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र विभागातील आमदार, भाजपा परिवारातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. sarav








