सोलपूर ; सोलापूर शहराच्या विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करत असून जलवितरण वाहिनीसाठी एक हजार कोटीचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात दररोज शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल. सोलापूर हे दक्षिणेकडे जाण्याचे गेट-वे आहे. पंढरपूर, तुळजापूर, सोलापूर ही धार्मिकस्थळे विमानसेवेमुळे मुंबईशी जोडली गेल्याने भाविकांची संख्या तिप्पट वाढून रोजगारही वाढेल, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

जिल्ह्यात नवीन पोलीस ठाण्याच्या इमारती उभ्या रहात आहेत. पोलिसांच्या निवासस्थानासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पोलिसांना चांगल्या सुविधा दिल्यास त्यांची कामगिरी चांगली होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीत चांगले काम केल्याबद्दल त्यांनी सोलापूर आणि धारशिवचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. संकटकाळी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे ३२ हजार कोटींचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी देण्यात आले असून महिनाभरात ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश सुपूर्द
बालाजी आमाईसच्यावतीने एक कोटीचा धनादेश, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने २५ लाख आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्यातर्फे २१ लाख, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, कुर्डुवाडी, पांगरी, वैराग जिल्हा सोलापूर आणि मोहोळ येथील नूतन पोलीस स्थानकाच्या इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी सोलापूर येथून मुंबईकडे जाणाऱ्या विमानातील पहिले प्रवासी बसव गायकवाड यांना मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आला.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीज
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींना संपूर्ण अन्नधान्य व दिवाळी किट मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानतळ परिसरात करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानाला झेंडा दाखवून सोलापूर ते मुंबई विमान सेवेचा शुभारंभ
सोलापूर विमानतळ येथून सोलापूर ते मुंबई या विमानसेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते स्टार एअरलाईनच्या विमानाला झेंडा दाखवून करण्यात आला.








