साेलापूर : सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमांतर्गत बालाजी अमाईन्स लिमिटेड या कंपनीतर्फे आज श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वाेपचार रुग्णालय यांना एक इलेक्ट्रिक कार भेट देण्यात आली. ही इलेक्ट्रिक गाेल्फ कार रुग्णालयातील रुग्ण, ज्येष्ठ नागरिक साेयीसाठीरुग्णालय वापरण्यात येणार आहे.
या वाहनाच्या माध्यमातून अपघात विभागातील तसेच रुग्णालयातील अंतर्गत प्रवास अधिक साेयीस्कर, जलद हाेणार आहे. याप्रसंगी रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. आर.डी. जयकर, बालाजी अमाईन्सचे संचालक राजेश्वर रेडडी व राम रेडडी, प्रिसीजन कॅमशाफ व्यवस्थापकीय संचालक डाॅ. सुहासिनी शहा, वैद्यकीय अधिक्षक डाॅ. एस. एस. ताेडकर, बाबा मिस्त्री, प्रसाद सांजेकर आदी उपस्थित हाेते. कार्यक्रमाचारे सुत्रसंचालन डाॅ. राजेश चाैगुले यांनी केले.







